News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 नीज ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी / अमावस्या प्रारंभ सकाळी ०६/५० मि
🌸 नक्षत्र…. आद्रा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १३ जूलै २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१३ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १३ जुलै २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे. पराक्रमातील चंद्र कामकाजात नवीन संधी निर्माण करील. कुटुंबियांचे चांगले सहकार्य मिळेल. शिव उपासना करावी. आर्थिक जोखमीच्या कामामध्ये विशेष लक्ष द्यावे लागेल.

वृषभ:- मन प्रसन्न राहील. प्रसन्नतेने केलेल्या कामामुळे चांगले यश लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. गरजेच्या नवीन वस्तु खरेदीचा योग संभवतो.

मिथुन:- कौशल्यपूर्ण संवादाने कामामध्ये चांगली प्रगती साधेल. नियोजनानुसार प्रयत्न करा वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. परिवारीक जीवन चांगले असेल.

कर्क:- मनाची चंचलता वाढेल. ध्यान प्राणायामाने प्रसन्नता वाढेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. धावपळ टाळा विश्रांती घ्या. आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते.

सिंह:- समाधानकारक घटना घडतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. सकारात्मक विचार व दत्त उपासनेने अपेक्षित लाभ मिळू शकतो.

कन्या:- नविन जबाबदारी वाढेल, कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी मिळेल. कामातील प्रगतीमुळे वरिष्ठांकडून कौतुक होईल. मित्र सहकार्यांची साथ मिळेल.

तुळ:- चांगला दिवस आहे. भाग्याची उत्तम साथ लाभेल. प्रवास कार्यसाधक होतील. धार्मिक व सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. सुसंवादाने नविन मित्र जोडले जातील.

वृश्चिक:- विचारपूर्वक निर्णय घ्या अनपेक्षित घटनामुळे चंचलता वाढू शकते. अनपेक्षित खर्च संभवतो. सकारात्मक विचार वाढवा ध्यान धारणा करून मनाची प्रसन्नता वाढवा. वाणीवर संयम राखावा.

धनु:- भेटीगाठीतून संवादातून संबंध दृढ होतील. मतभेद कमी होतील. भागीदारीच्या कामात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक कामामध्ये प्रगती साधेल.

मकर:- धावपळ होईल कामाचा ताण वाढू शकतो, नियोजनानुसार कामामध्ये यश मिळेल. सहकाऱ्यांची मदत लाभेल. कौटुंबिक मतभेद संवादातून टाळता येतील.

कुंभ:- आवडीचे काम कराल छंद जोपासण्यासाठी वेळ द्याल. प्रेमसंबंध दृढ होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील.

मीन:- कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न कराल. घरगुती वातावरण सुखद राहील. वरिष्ठांचे तज्ञांचे मार्गदर्शन उपयोगी होईल. दत्त उपासना लाभदायक होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *