News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260707 WA0028

आधीचे जगले नाही अन नव्याने लाखो झाडं लावायचा आदेश!

बीड -शासनाचा आदेश आला कि यंत्रणेने कामाला लागायचे, कागदावर आदेशाचे पालन करायचे अन पाठ थोपटून घ्यायची ही सवय सगळ्यांचं प्रशासकीय यंत्रणेला लागलेली आहे. याचा अनुभव बीड जिल्ह्यात तर नित्याचाच झाला आहे. गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीड जिल्ह्यात 70 लाख झाडं लावण्यात आली. मात्र ती फक्त कागदावरच लावली होती हे आता उघड झालं आहे. स्वतः जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या नावाने लावलेले झाडं देखील जळून गेले आहे. कारण झाडं लावल्यानंतर त्याकडे पुन्हा कोणीच पाहिले नाही. असं असताना आता पुन्हा यावर्षीसाठी नव्याने 70 लाख झाडं लावण्याचे आदेश आले आहेत. हे म्हणजे मागचे पाढे पंचावन्ना अशीच अवस्था आहे. याकडे पालकमंत्री सुनेत्रा पवार लक्ष देणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.

राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात कोट्यावधी झाडे लावण्याचे आदेश निघतात. सामाजिक वनिकारण आणि वन विभाग, कृषी विभागाचे अधिकारी महिनाभर फार कामात असल्याचा आवडत आणतात आणि महिनाभरानंतर लाखो झाडे लावल्याचे कागदावर दाखवले जाते.

img 20260707 wa00301777880193094180467

त्या त्या जिल्ह्यात मंत्री, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फोटोसेशन केले जाते आणि नंतर केवळ आकडेमोड करून पाठ थोपटून घेतली जाते.

img 20260707 wa00328572453562784509105

मागील वर्षी राज्य शासनाच्या वतीने बीड जिल्ह्यात 70 लाख झाडं लावण्याचे आदेश दिले होते. विशेष म्हणजे यामध्ये 30 लाख झाडं ही तुतीची होती. त्यासाठी स्वतः तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये लाखो रुपये खर्चून झाडं लावण्याचा उपक्रम पार पाडण्यात आला.

img 20260707 wa00331565511396016989789

झाडं लावली पण नंतर त्याची निगा कोण राखणार याचा विचार कोणीच केला नाही. केवळ कागदी घोडे नाचवत यंत्रणेने झाडं लावण्याचा उपक्रम केला. परंतु वर्षभरत शे दोनशे झाडं सुद्धा जगली नाहीत. मात्र एका दिवसात 30 लाख झाडं लावली म्हणून जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचा सत्कार पार पडला.

यावर्षी देखील पुन्हा नव्याने लाखो झाडं लावण्याचे उदिष्ट देण्यात आले असून प्रशासकीय यंत्रणा त्यासाठी कामाला लागली आहे. आता काही दिवसांनी झाडं लावण्याचे फोटोसेशन केले जाईल आणि त्यानंतर याची बिल उचलली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *