मुंबई -विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र नाशिक येथील निकालाने महायुतीमध्ये वादाची ठिणगी पाडणारा ठरण्याची शक्यता आहे. अकरा पैकी दहा जागी महायुतीचे उमेदवार विजयी झाले. मात्र नाशिक मध्ये अपक्ष बंडखोर गोकुळ गित्ते यांनी महायुतीचे नरेंद्र दराडे यांचा पराभव केला.
निवडणुकीआधीच 17 पैकी 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. त्यामुळे आज उरलेल्या 11 जागांचा निकाल समोर आला. 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे. तर नाशिकमध्ये महायुतीमध्ये असलेल्या शिवसेना शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. नाशिकमध्ये अपक्ष आणि भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गिते (Gokul Gite) यांचा विजय झाला आहे. शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपने 11, शिवसेनेने 4 तर राष्ट्रवादीने 2 जागांवर निवडणूक लढवली होती.
विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा बोलबाला राहिला. तर महाविकास आघाडीची पिछेहाट पाहायला मिळाली. राज्यातील 17 पैकी 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर अपक्ष आणि भाजप बंडखोराचा विजय झाला. भाजप, 11, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि अपक्ष 1 असा विधान परिषदेचा निकाल लागला आहे. दरम्यान, स्थानिक संस्थांच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी होण्यासाठी एकूण वैध मतांच्या पन्नास टक्के अधिक एक मत, असा ‘विजयाचा कोटा’ निश्चित केला जातो. पहिल्या पसंती क्रमाच्या मतमोजणीत हा कोटा पूर्ण न झाल्यास, दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात.
ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)
छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
नाशिक- गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
भंडारा- गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर, भाजप
सांगली- सातारा- धैर्यशील कदम, भाजप
परभणी- हिंगोली- सईद खान, शिवसेना
सोलापूर- राजेंद्र राऊत, भाजप
धाराशिव-लातूर- बीड- बसवराज पाटील, भाजप
नागपूर- राजीव पोतदार, भाजप
जळगाव- नंदकिशोर महाजन, भाजप
अमरावती- प्रवीण पोटे, भाजप
नांदेड- अमर राजूरकर, भाजप





Leave a Reply