News & View

ताज्या घडामोडी

20260611 111718 scaled

टू व्हीलर वरून वाळू वाहतूक!तहसीलदार खोमणे यांचा आणखी एक प्रताप!

बीड – वाळू मुरूम अथवा खडी वाहतूक करण्यासाठी शक्यतो ट्रॅक्टर हायवा किंवा ट्रकचा वापर केला जातो शक्यतो चार-सहा दहा किंवा बारा चाकी वाहनातूनच वाळूची वाहतूक करणे शक्य असते मात्र तब्बल 25 ते 50 हजार ब्रास वाळूवर दरोडा घालून शासनाची 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. खोमणे यांनी चक्क दुचाकीवरून वाळू वाहतूक झाल्याचे दाखवले असून अनेक दुचाकी वाहनांच्या नंबर वर ईटीपी पावत्या फाडण्यात आल्या आहेत.

गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे , तलाठी गोविंद ढाकणे आणि त्यांच्या सिंडिकेट ने ऑगस्ट 2025 ते जून 2026 या दहा महिन्यांच्या काळात गोदावरी नदी पात्रातून घरकुलधारकांना वाळू वाटप करण्याच्या नावाखाली तब्बल 25 ते 50 हजार ब्रास वाळूची चोरी केली

याबाबत न्यूज अँड व्ह्यूज ने मालिका प्रकाशित केल्यानंतर आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन एस आय टी चौकशीची मागणी केल्यानंतर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशी समिती नेमली.

यामध्ये तहसीलदार खोमणे यांच्यासहित 38 ते 40 जण दोष आढळले परंतु जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी खोमणे आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल करण्याऐवजी दोन तीन तलाठी एक पोलिस हवालदार आणि सरपंच व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून स्वतःची पाठ थोपटून घेतली

दरम्यान गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांनी घरकुल च्या नावाखाली ज्या वाहनातून वाळू वाहतूक केल्याचे दाखवले आहे त्याची पडताळणी न्यूज अँड व्ह्यूजने केली त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. एम एच 27 बी यु 22 67 या वाहनातून एक ब्रास वाळूची वाहतूक ही 5 मार्च 2026 रोजी सकाळी दहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी राक्षस भुवन ते पांचाळेश्वर पर्यंत करण्यात आल्याचे दाखवले आहे.

20260610 1601178650861436325802970
वरील छायाचित्रात दोन नंबर वरील वाहनातून म्हणजेच एमएच २७ बी यु 22 67 मधून एक ब्रास वाळू वाहतूक केल्याचे दाखवले असून त्याची ईटीपी पावती छायाचित्रात दिसत आहे.
img 20260618 wa00453797435616136784759
ज्या वाहनातून एक ब्रास वाळूची वाहतूक केल्याचे दाखवण्यात आले आहे त्याची आरटीओ ॲपवरून काढलेली डिटेल माहिती वरील छायाचित्रात दिसत असून संबंधित वाहन हे स्कूटर असल्याचे स्पष्ट होत आहे.

विशेष बाब म्हणजे सदरील क्रमांक हा दुचाकी स्कूटरचा असल्याचे न्यूज अँड व्ह्युजच्या पडताळणीमध्ये स्पष्ट झाले आहे. एखाद्या स्कूटर वरून एक ब्रास वाळू कशी नेली असेल असा प्रश्न आम्हाला देखील पडला असून तहसीलदार खोमणे यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जेवढ्या ईटीपीच्या पावत्या गेवराई तहसीलदारांनी घरकुल च्या नावाखाली वाटप केले आहेत त्या सर्वांची आरटीओ कार्यालयामार्फत चौकशी करावी त्यामध्ये हायवा आणि ट्रॅक्टरच्या ऐवजी अनेक टू व्हीलर वरून वाळू वाहतूक केल्याचे आणि त्यांच्या नावावर ईटीपी पावत्या फाडल्याचे स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *