News & View

ताज्या घडामोडी

20260611 111718 scaled

वाळू चोरी प्रकरण :चोर सोडून सन्याशाला फाशी!जिल्हाधिकारी जॉन्सन यांचा अजब कारभार!

बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंदिकेटने राक्षस भुवन गोदावरी पात्रातून 25 हजार पेक्षा अधिक ब्रास वाळू चा उपसा करून घरकुल च्या नावाखाली या वाळूची चोरी केल्याचे प्रकरण जिल्ह्यात गाजत आहे या प्रकरणात खोमणे यांच्यासहित 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हे दाखल होणार अशी शक्यता व्यक्त केली जात असताना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी चौकशीचा मोठा आव आणत तहसीलदार खोमणे मंडळ अधिकारी चांदणे यांना वगळून इतर 19 लोकांवर गुन्हे दाखल करत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न केला आहे या संपूर्ण वाळू चोरी आणि सिंडिकेट प्रकरणाचा मास्टरमाइंड असणारा आणि खरा दोषी असणारा तहसीलदार संदीप खोमणे याला कोणाच्या दबावाला बळी पडून जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला आहे अशी चर्चा आता सुरू झाली आहे

गेवराई तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार वाळू वाटप करण्याच्या नावाखाली तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांच्या सिंडिकेट ने तब्बल 90 ते 100 कोटी रुपयांची 25 ते 50 हजार ब्रास वाळू चोरी केली आणि ही वाळू खुल्या बाजारात विक्री केली.

या सर्व प्रकरणात न्यूज अँड व्ह्यूज ने पाठपुरावा करून वृत्त मालिका प्रकाशित केली तसेच गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी पत्रकार परिषद घेऊन एस आय टी चौकशीची मागणी केली होती.

आपल्यावर कारवाई होणार याची बातमी कन्फर्म झाल्यानंतर तहसीलदार संदीप खोमणे हे थेट मुंबईला पोहोचले तेथे त्यांनी त्यांच्या जवळच्या मंत्र्यांमार्फत थेट महसूल मंत्र्यांपर्यंत वशिला लावला आणि तेथून जिल्हाधिकारी यांना फोन आपणही झाल्यानंतर खोमणे यांच्यावरचा गुन्हा दाखल करणे टाळण्यात आले अशी चर्चा सुरू झाली आहे.

या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक अशा 38 जणांची दिवसभर चौकशी केली त्याचा अहवाल तयार केला तसेच तहसीलदार संदीप खोमणे यांची देखील शोकास नोटीस देऊन चौकशी केली त्यामुळे या सर्व प्रकरणात तहसीलदार खोमणे आणि इतर दोषी 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल होतील आणि ते निलंबित होतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती.

सत्ताधारी पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी तब्बल 100 कोटी रुपयांच्या वाळू चोरी प्रकरणाची इत्यंभूत माहिती आणि तक्रार जिल्हाधिकारी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत केल्यानंतरही त्यांच्या तक्रारीला एक प्रकारे केल्याची टोपली दाखवत संदीप खोमणे यांना वाचवण्यात आले आणि आमदार पंडित यांच्यावर एक प्रकारे अविश्वासच दाखवला गेला की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे

मात्र जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी एवढ्या मोठ्या गंभीर प्रकरणात तहसीलदार संदीप खोमणे यांना पाठीशी घातले की काय अशी शंका येऊ लागली आहे कारण वाळू चोरीच्या प्रकरणात चकलंबा पोलीस ठाण्यामध्ये नायब तहसीलदार संजय सोनवणे यांच्या फिर्यादीवरून केवळ 19 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत विशेष बाब म्हणजे यामध्ये तहसीलदार संदीप खोमणे आणि मंडळ अधिकारी चांदणे यांचा साधा उल्लेख देखील केला गेलेला नाही त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत

गु.र.नं व कलम-
199/2026 कलम 61(2)(अ), 305(ई), 316(5), 318(4), 336(3), 340(2), 3(5) बी.एन.एस सह कलम 66(c), 66(d) आय.टी.अ‍ॅक्ट व कलम 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कलम 3(1) लोकसंपत्ती नुकसान निवारण कायदा (पी.डी.पी.पी अ‍ॅक्ट) 1984

फिर्यादी – संजय दत्तात्रय सोनवणे, वय-50 वर्षे, व्यवसाय- नायब तहसिलदार, (महसूल-2) तहसिल कार्यालय, गेवराई.मो.न- 7841009999,

आरोपी

  1. गोविंद ढाकणे, ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, गेवराई
  2. किरण दांडगे, ग्राम महसूल अधिकारी, तहसिल कार्यालय, गेवराई
  3. विश्वजीत शेंबडे पाटील, खाजगी संगणक चालक, तहसिलकार्यालय, गेवराई
  4. शुभम गायकवाड, महसूल सेवक, तहसिल कार्यालय, गेवराई
  5. गोविंद दिलीप मगर रा धुमेगाव ता.गेवराई मो.नं. 9730414050
  6. योगेश दिलीप मगर रा.धुमेगाव ता.गेवराई मो.नं. 9359165445
  7. अशोक चवकर मो.नं. 9822813350
  8. मुकेश उद्धव बोराडे उपसरपंच गंगावाडी
  9. दादासाहेब रमेश माळी रा. बेलगाव मो. नं 8805198678
  10. यासीन तांबोळी रा. हिरापूर ता.गेवराई मो.नं. 9273333136
  11. अमोल अप्पासाहेब लाखे रा. एरंडगांव ता.गेवराई जि.बीड मो.नं. 9422979780
  12. शितल शिवाजी धोंडरे, सामाजिक कार्यकर्ता, रा. देवी मंदिराजवळ जातेगाव
  13. भागवत राधाकिसन जाधव, सरपंच मौजे बेलगुडवाडी ता. गेवराई मो.नं.9403789384
    14. कल्याण पवार (पोलीस) रा.उमापूर ता.गेवराई मो.नं 9075125669* *15. के.एम.पवार रा. उमापूर ता.गेवराई
  14. सोहेल सोदागर रा. उमापूर 8530454902
  15. शाहरुख मुसा पठाण रा. गढी ता. गेवराई मो.नं.9552949234
  16. अजय चाळक ग्रामपंचायत सेवक मो.नं 7823856643
  17. बाबासाहेब तुकाराम सांगळे रा.भायाळ ता.पाटोदा जि.बीड मो.न 9011536367

गु.घ.ता.वेळ ठिकाण– माहे ऑगस्ट 2025 पासून राक्षसभुवन घाटातून ते आज रोजी पर्यंत

गु.दा.,ता.वेळ – दिनांक 16/06/2026 रोजी 20.44 वा
उशिराचे कारण – आज रोजी चौकशी समीती अहवाल सादर करुन पोस्टेला समक्ष आल्याने

**खुलासा/हकीगत ** – वरील ता वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांना मा.जिल्हा अधिकारी यांचे आदेशानुसार गठीत चौकशी समीती राक्षसभुवन रेती घाट ता गेवराई येथील अवैध रेती उत्खनन व वाहतुक व घरकुल लाभार्थी वितरणा संदर्भात दोषी आढळल्याने शासकीय कर्मचारी व खाजगी इसम यांचे विरुद्ध शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, बेकायदेशीर उत्खनन, डिजिटल डेटाची चोरी करुन फसवणूक, गोदावरी नदीपात्राचे पर्यावरणीय नुकसान व विद्रुपीकरण, गुन्हेगारी स्वरूपाचा कट आणि शासकीय यंत्रणेची फसवणुक केली म्हणून गुन्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *