News & View

ताज्या घडामोडी

881655189097502023f3aa7d0b38cf89 original

खोमणेनी वरिष्ठ अधिकारी मॅनेज केले!एसडीएम मॅडमचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!

बीड – गेवराई चे तहसीलदार संदीप खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे या तिघांनी घरकुलासाठी वाळू वाटप करण्याच्या नावाखाली गोदापात्रावर दरोडा घालण्याचा जो काही प्रकार सुरू केला आहे त्याला गेवराई आणि बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांचा देखील अर्थपूर्ण पाठिंबा आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.ग्रामस्थांसहित विविध वर्तमानपत्र,सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी जिल्हाधिकारी आणि एसडीएम यांच्याकडे तक्रारी केल्यानंतरही तहसीलदार खोमणे या अधिकाऱ्यांना कसं मॅनेज करतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

बीड जिल्ह्यात गोदावरी नदीच्या काठावर बेसुमार वाळू उपसा तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाचे आशीर्वादाने सुरू आहे खळेगाव सावळेश्वर माळस पिंपळगाव राक्षस भुवन यासहित अनेक गोदाकाठच्या गावांमधून तहसीलदार संदीप खोमणे आणि यंत्रणेला दररोज भाग दोन लाख रुपये ठरवून वाळू चोरी केली जात आहे.

गेवराई तालुक्यात अधिकृतपणे केवळ चारच वाळू घाट लिलावा द्वारे वाटप झाले आहेत या ठिकाणाहून 2026 च्या फेब्रुवारी पर्यंत 714 घरकुलांना वाळू वाटप करण्याचे टार्गेट देण्यात आलेले आहे मात्र तहसीलदार खोमणे राक्षस भुवन चे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे हे राक्षस भवन येथे नव्यानेच घरकुल साठी वाळू ठेका सुरू करतात गणपती पॉईंट येथून काही घरकुलधारकांचे अर्ज मागून घेत एटीपी जनरेट केली जाते आणि ही वाळू थेट बीड धाराशिव या ठिकाणी खाली केली जाते.

मागील आठ-दहा दिवसांपूर्वी तहसीलदार खोमणे मंडळ अधिकारी चांदणे आणि तलाठी ढाकणे यांनी राक्षस भवन येथील गणपती पॉईंट येथून घरकुलाच्या नावाखाली सर्रास शेकडो हवा भरून वाळू चोरी करत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला सायंकाळी सहानंतर देखील रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत वाळू उपसा सुरू असल्याचे दिसल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले मात्र खोमणे अँड कंपनीने या ग्रामस्थांवरच शासकीय कामात अडथळा आणला या नावाखाली गुन्हे दाखल करून त्यांचाच आवाज दडपण्याचा प्रकार केला.

विशेष बाब म्हणजे बीड आणि गेवराई मधील जे हायवा मालक आहेत त्यांनाच या ठिकाणी पार्टनर म्हणून तहसीलदार घेतात आणि प्रत्येक गाडीमागे किमान सहा हजार रुपये घेतले जातात.

हा सगळा प्रकार गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे याबाबत गेवराई बीड येथील अनेक वृत्तपत्र पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी थेट जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्याकडे पुराव्यासहित तक्रारी केलेले आहेत मात्र संदीप खोमणे यांना साधी नोटीस काढण्याचे धैर्य देखील या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखवलेलं नाही.

उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांची कारकीर्द तशी वादग्रस्तच राहिलेली आहे भूसंपादनाचे अनेक न्याय निवाडे करताना त्यांनी बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचे देखील तक्रारी आहेत तसेच अटकेत असलेले जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या भूसंपादन घोटाळ्याशी देखील कविता जाधव यांचा संबंध असल्याची चर्चा आहे त्यांची यासाठी एस आय टी कडून चौकशी देखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या अधिकारी जर सर्वसामान्य माणसावर अन्याय करून धनिकांच्या बटीक बनणार असतील तर त्यांच्याकडून खोमणेवर कारवाईची अपेक्षा करणे चूकच ठरेल अशी चर्चा सामान्य लोकात होत आहे.

दिवसभरात आणि रात्री अप रात्री केव्हाही राक्षस भुवन उमापूर या फाट्यावर उभा राहिल तर शेकडो हायवा वाळू चोरी करत असल्याचे चित्र पाहायला मिळते या ठिकाणी माजी मंत्र्यांच्या सुपुत्राने देखील प्रशासनासोबत पार्टनरशिप करत अनधिकृत पणे वाळू उपसा सुरू ठेवला आहे विशेष बाब म्हणजे त्यांचा ढाकणे नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्या नावावर असलेल्या सावरगाव येथील टेंडरला जिल्हाधिकाऱ्यांनी तीन कोटी पेक्षा अधिक दंड करून हे टेंडर बंद केले होते पण राजकीय दबाव आणत हे टेंडर पुन्हा सुरू केले गेले आणि त्यासोबतच इतर ठिकाणाहूनही तहसीलदार यांना त्यांचा त्यांचा हप्ता देत वाळू उपसा केला जात असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *