News & View

ताज्या घडामोडी

20260522 080742 scaled

रेनीसन च्या डॉ शिरूरे मुळे भाशिप्र येणार अडचणीत!

लातूर -नीट पेपरफुटी प्रकरणात रोज नवनवे खुलासे होतं आहेत. लातूरचा शिवराज मोटेगावकर आणि पी व्ही कुलकर्णी यांची अटक झाल्यानंतर डॉ मनोज शिरूरे यांनाही अटक करण्यात आली आहे. हे महाशय भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या अनधिकृत असलेल्या रेनीसन इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष आहेत हे विशेष. त्यामुळे या तपासात पेपरफुटीचे धागेदोरे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेपर्यंत पोहचल्यास आश्चर्य वाटायला नको.मोटेगावकर हा काँग्रेस चा म्हणजेच आ अमित देशमुख यांचा कार्यकर्ता असल्याचे सांगत जे भाजपचे नेते टीका करत होते आता डॉ शिरूरे यांच्या अटकेनंतर तेच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


वैद्यकीय पात्रता परीक्षा अर्थात नीट युजी परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आली असून 21 जून रोजी नव्याने परीक्षा घेण्यात येणार आहे दरम्यान या परीक्षेत गडबड घोटाळा करणाऱ्या नाशिक अहिल्यानगर पुणे लातूर राजस्थान हरियाणा येथील बारा ते पंधरा जणांना सीबीआयने आतापर्यंत अटक केली आहे.


या सर्व पेपर फुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड हा लातूर येथील आरसीसी कोचिंग क्लासेस चा मालक शिवराज मोठेगावकर हा असल्याचे उघडके झाल्यानंतर सीबीआय ने त्याला अटक केली तसेच निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना देखील अटक केली. या दोघांच्या चौकशीत अनेक पालक आणि विद्यार्थ्यांची नावे समोर आली पाच ते दहा डॉक्टर आणि शेकडो विद्यार्थ्यांनी हा पेपर विकत घेतल्याचे चौकशी स्पष्ट झाले आहे.

डॉ शिरूरे हे ज्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या इंग्लिश स्कुल चे अध्यक्ष आहेत त्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेत बोगस शालर्थ आयडी प्रकरणावरून मोठा वाद सुरु आहे. संस्थेच्या माजी अध्यक्षानी विद्यमान कार्यवाह यांच्यासह पदाधिकारी यांच्यावर कोट्यावधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप केला आहे. आता नीट प्रकरणात या संस्थेच्या डॉक्टर ची अटक झाल्याने मूळ भाशिप्र ही संस्था देखील अडचणीत येणार हे निश्चित झाले आहे.


चौकशीअंती सीबीआयने लातूर येथील बालरोग तज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना अटक केली आहे या डॉक्टरने आपल्या मुलाचा नंबर मेडिकलला लागावा यासाठी शिवराज मोठे गावकर यांच्याकडून नीट चा पेपर विकत घेतला होता अशी माहिती सीबीआयला मिळाली आहे.
सीबीआई ने ताब्यात घेतलेला डॉक्टर शिरुरे हा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या रेनी सन इंग्लिश स्कूल चा अध्यक्ष आहे आणि शासनाची परवानगी न घेता 2019 पासून ही इंग्लिश स्कूल बेकायदेशीरपणे सुरू असल्याने मार्च 2026 मध्ये ही शाळा बंद करण्याचे आदेश लातूरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले होते तरी देखील या आदेशाला केराची टोपली दाखवत यावर्षी सुद्धा या शाळेने प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवलेली आहे.


डॉक्टर शिरुरे यांच्या अटकेमुळे भारतीय जनता पक्ष तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचा यामध्ये सहभाग आहे की काय अशी चर्चा सुरू झाली आहे कारण डॉक्टर शिरुरे हे भाषीप्रशी संबंधित असून ते अनधिकृत असलेल्या रेडिसन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष आहेत त्यामुळे भाशीप्र च्या लातूर आणि उदगीर येथील बारावीच्या विद्यार्थ्यांना देखील हे नीट चे पेपर पुरवण्यात आले असावेत अशी शंका सीबीआयला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *