अंबाजोगाई –देशभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या NEET (वैद्यकीय पात्रता परीक्षा) पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे आता बीड जिल्हा-सह अंबाजोगाईत पोहोचल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी अंबाजोगाई शहरातील गुरुवार पेठ भागातील एकाच घरातील दोन विद्यार्थी आणि पालकांची चौकशी केली आहे.दोन संशथित विद्यार्थ्याची तब्बल दोन तास कसून चौकशी केली.विशेष म्हणजे या दोन विद्यार्थ्याना आणि त्यांच्या पालकांना घरातून बाहेर दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं ही चौकशी करण्यात आली.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
CBI चे विशेष तपास पथक आज सकाळी अत्यंत गुप्त्पणे अंबाजोगाई शहरात दाखल झाले. स्थानिक पोलिसांनाही फारशी कल्पना न देता पथकाने थेट संशथित विद्यार्थ्यांचा शोध घेत कारवाई सुरू केली. त्यानंतर दोन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन एका अनोळखी ठिकाणी त्यांची सखोल चौकशी करप्यात आली.
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गैरमार्गाने अथवा आर्थिक देवाणचेवाणीद्वारे प्रश्नपत्रिका मिळवली असल्याचा संशय CBI ला आहे.चौकशीदरम्यान तपास यंत्रणेने महत्वाचे पाऊल उचलत दोन्ही विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन आणि मेमरी कार्ड जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हे दोन्ही विद्यार्थी लातूर येथो राहून NEET परीक्षेची तयारी करत होते. यामुळे या प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरमधील कोचिंग नेटवर्क आणि संभाव्य रॅकेटकडे वळल्याची चर्चा सुरू झाली आहे.
नीट पेपरफुटी चे बीड कनेक्शन उघडकीस आल्यानंतर आता अंबाजोगाई मध्ये देखील चौकशी सुरु झाल्याने खळबळ उडाली आहे. बीडमधील काही क्लासचालकांची चौकशी करण्यात आली असून अनेकजण चौकशी च्या भीतीपोटी गायब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बीड आणि लातूर जिल्हा आधीपासूनच नीट पेपर फुटी प्रकरणातील संशथितांमुळे चर्चेत आहे. आता थेट अंबाजोगाईत CBI ने कारवाई केल्यामुळे मराठवाड्यात या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.





Leave a Reply