News & View

ताज्या घडामोडी

n71265274817790876104682cc7801898d947d22dce76d09768ca3241f3bb4ee80cfd3a2fa06066b42fd5c4

सायकलवरून फिरणारा मोटेगावकर काही वर्षात बनला अब्जधिश!

लातूरएकेकाळी सायकलवर येऊन क्लास घेणारा आरसीसी क्लासेस चा मालक शिवराज मोटेगावकर याच गेल्या काही वर्षातील वाढलेलं साम्राज्य झपाट्याने वाढत गेले. कोणतीही जमीन, प्लॉट कितीही किमतीत विकत घ्यायचा या उद्देशाने तो बैठक करत असे. नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याचे अनेक कारनामे समोर आले आहेत. मोटेगावकर याच्या मोबाईल मध्ये 23 एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षेच्या बारा दिवस अगोदर पेपर आला होता, त्याच्या मोबाईल मध्ये अनेक पुरावे सापडले असून त्याच्या अडचणी जास्तच वाढल्या आहेत.

रविवार, 17 मे 2026 रोजी सायंकाळी 7:15 वाजता ही धडक कारवाई करण्यात आली. या अटकेमुळे लातूरसह संपूर्ण राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सीबीआय तपासातील धक्कादायक खुलासे

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोटेगावकर हे पेपर लीक करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचे सक्रिय सदस्य आहेत. तपासादरम्यान खालील अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या आहेत:

परीक्षेपूर्वीच पेपर हस्तगत: तपासात असे निष्पन्न झाले आहे की, परीक्षेच्या आधीच म्हणजेच २३ एप्रिल २०२६ रोजी मोटेगावकर यांनी नीट युजी परीक्षेचे प्रश्न आणि उत्तरे मिळवली होती.

मोबाईलमध्ये पुरावे: 14 मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीत, त्यांच्या मोबाईल फोनमध्ये या परीक्षेचे लीक झालेले प्रश्न आढळून आले होते.

अटकेत असलेले शिवराज मोटेगावकर महाराष्ट्राच्या कोचिंग विश्वात एम सर म्हणून ओळख निर्माण केली आहे. मोटेगावकर हे लातूरचे असून रसायनशास्त्राचे शिक्षक आहे. ते एका शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांची लातूरमधील आरसीसी क्लासेस म्हणजे रेणुकाई केमस्ट्री क्लासेसला महाराष्ट्रात नावारूपाला आणणले. महाराष्ट्रात नीट-जेईई कोचिंग ब्रँडपैकी एक नावाजलेली संस्था आहे. त्यांनी सुरूवातीला विज्ञान शाखेची खाजगी शिकवणी घेण्यास सुरुवात केली. 1999 मध्ये त्यांनी भाड्याच्या खोलीत कोचिंग क्लासेस घेण्यात सुरु केली. तेव्हा इथे 10 विद्यार्थी यायचे. शेतकरी कुटुंबातील मोटेगावकर अनेक वेळा सायकलवरून प्रवास करायचे.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: परीक्षा पार पडल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रश्नपत्रिका डिलीट/नष्ट केल्याचे तपासात समोर आले आहे.

माहिती देण्यास टाळाटाळ: ही प्रश्नपत्रिका त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना आणि व्यक्तींना पुरवल्याचा संशय आहे. मात्र, ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांना हे पेपर दिले गेले, त्यांची नावे सांगण्यास मोटेगावकर यांनी सीबीआय अधिकाऱ्यांना टाळाटाळ केली.

गंभीर कलमांअंर्गत गुन्हा दाखल

शिवराज मोटेगावकर यांच्यावर खालील कायद्यांनुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे:

१. भारतीय न्याय संहिता (BNS)

२. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (PC Act)

३. सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४

त्यांच्यावर फसवणूक करणे, गुन्हेगारी कट रचणे आणि राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेत गैरप्रकारांना खतपाणी घालणे यांसारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *