सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण दर्श अमावस्या / भावुका अमावस्या / अमावस्या प्रारंभ पहाटे ०५/११ मि. / अमावस्या समाप्ती रात्री ०१/३१मि.(शनैश्वर जयंती)
🌸 नक्षत्र…. भरणी
🌸 वार…. शनिवार
🌼 दिनांक….. १६ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस व्यर्ज
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक १६ मे २०२६‼️
मेष
आज
आज कामात नवीन कल्पना सुचतील. वरिष्ठांकडून मदत मिळू शकते. भावनिक निर्णय घेणे टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल.अचानक घरगुती खर्च वाढू शकतो. गुंतवणुकीत सावध राहा.
वृषभ
आज
भाग्याची साथ मिळेल. प्रवास, शिक्षण किंवा धार्मिक कार्यात यश मिळू शकते. आर्थिक बाबतीत सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता.
मिथुन
आज
मन थोडं गंभीर राहू शकतं. करिअरमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. जुन्या अडचणींवर उपाय सापडेल. संयम ठेवणं महत्त्वाचं.स्वतःवर विश्वास ठेवा.
कर्क
आज
आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. मैत्र किंवा जवळच्या व्यक्तीकडून मदत मिळेल. मानसिक शांतता मिळवण्यासाठी ध्यान उपयोगी ठरेल.
सिंह
आज
कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचं कौतुक होईल. अचानक बदल स्वीकारावे लागू शकतात. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या.
कन्या
आज
शिक्षण, परीक्षा किंवा मुलाखतीसाठी दिवस अनुकूल आहे. जोडीदारासोबत संवाद सुधारेल. नवीन संधी चालून येईल.
तुळ
आज
आज आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. थकवा किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. कामात शांतपणे निर्णय घेतल्यास फायदा होईल.
वृश्चिक
आज
प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल. कला, लेखन किंवा सर्जनशील कामात प्रगती होईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते.
धनु
आज
घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. आई किंवा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी लागेल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत चर्चा होऊ शकते.
मकर
आज
आज संवादकौशल्यामुळे कामात यश मिळेल. छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. मित्रमैत्रिणीसोबत चे जुने मतभेद दूर होतील.
कुंभ
आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे. नवीन काम किंवा व्यवसायात प्रगती दिसेल. मनस्वास्थ चांगले राहील.तांत्रिक, क्रिएटिव्ह किंवा संशोधन क्षेत्रातील व्यक्ती साठी दिवस विशेष अनुकूल आहे. वरिष्ठांसोबतचे संबंध सुधारतील.
मीन
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आज आत्मविश्वास वाढेल. अंतर्मनाचा आवाज ऐका. आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन रमू शकतं. नवीन काही सुरुवातीसाठी दिवस चांगला आहे.





Leave a Reply Cancel reply