News & View

ताज्या घडामोडी

Screenshot 20250818 105031 Google

पूर्णवादी ने जपले ग्राहकहीत, विमा क्लेम मंजूर!

शिरूर कासार -भारतीय आयुर्विमा महामंडळा मार्फत भरलेला प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत पूर्णवादी नागरि सहकारी बँकेच्या ग्राहकाने केलेला क्लेम मंजूर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करत बँकेच्या शिरूर शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ग्राहकहीत जोपासले आहे. पदमजा कुलकर्णी यांच्या निधनानंतर त्यांच्या वारसाना दोन लाख रुपयाचा क्लेम बँकेने मंजूर करून दिला.

देशातील सर्वच सहकारी बँकामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योत विमा योजना भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत राबवली जाते. खातेदराच्या खात्यातून दरमहा ठराविक रक्कम महामंडळ कडे वर्ग केली जाते. योजनेत सहभागी असलेल्या खातेदाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाना विमा रक्कम दिली जाते.

प्रधानमंत्री जिवन ज्योती या योजनेअंतर्गत पुर्णवादी बॅंकेच्या शिरूर कासार शाखेतून मार्फत कै.कुलकर्णी पद्मजा पद्माकर यांनी विमा घेतला होता.त्यांच्या निधनानंतर श्री पद्माकर अवधुत कुलकर्णी यांनी विमा रक्कम मिळण्यासाठी पुर्णवादी बॅंकेच्या मार्फत प्रस्ताव दिला होता त्यांना विमा कंपनीकडून आज रुपये 2,00,000/-मिळाले त्या बद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानलले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *