News & View

ताज्या घडामोडी

Screenshot 20250818 105031 Google

जालना मर्चंट मधील गैरव्यवहाराशी पूर्णवादी चा संबंध नाही :ग्राहकांनी काळजी करू नये!

बीडजालना मर्चंन्ट बँकेत झालेल्या गैरव्यवहाराशी पूर्णवादी बँकेचा काहीही संबंध नाही. या बँकेत जो गैरव्यवहार झालेला आहे त्याबाबतीत आमच्या बँकेने गुन्हे दाखल केले आहेत, तसेच उर्वरित लोकांकडून वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. बँकेच्या ग्रहकांनी काळजी करू नये असे आवाहन बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष जोशी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांनी केले आहे.

पूर्णवादी बँकेच्या सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येते की, बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून 31.03.2026 अखेर बँकेच्या एकूण ठेवी रू. 961 कोटी व कर्जे रू. 569 कोटी असा एकूण व्यवसाय रू.1530 कोटी आहे. तसेच गुंतवणूक रू.439 कोटी व बँकेचा नेट एनपीए केवळ 0.62 % आहे. तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळातील सदस्य हे बीड शहरातील नामांकित व सर्व परिचित आहेत त्यामुळे मिडीया मध्ये आमच्या जालना शाखे संदर्भात येत असलेल्या बातम्यामुळे गोंधळून न जाता बँकेवर विश्वास ठेवावा व आपणास या संदर्भात काही अडचणी असल्यास बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष जोशी, उपाध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत पारनेरकर, बँकेचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष डॉ. अरुण निरंतर, तसेच बँकेचे व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सी.ए. एस. पी. लड्डा तसेच संचालक मंडळातील सर्व संचालक, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी यांचेशी संपर्क साधावा असे नम्र आवाहन करण्यात येते.

आमच्या जालना शाखेमध्ये पंचमुखी वेअरहाऊसच्या मालाच्या पावती तारण कर्जात पंचमुखी वेअरहाऊसचा प्रोप्रायटर रायचंद सखाराम कुरंगळ व या कर्जप्रकारातील कर्जदार यांनी संगनमत करून या सर्वांनी मिळून बँकेची दिशाभूल केली आहे. यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने याप्रकरणी कडक कारवाईचे निर्देश दिले असून त्यानुसार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 21.04.2026 रोजी या सर्वांच्या विरोधात पोलिस स्टेशन, जालना येथे गुन्हे दाखल करणे संदर्भात तक्रार दाखल केली आहे.

आज अखेर या कर्जप्रकारात 32 पैकी 9 कर्जखाती बेबाक झाली आहेत व 23 खात्यावर एकूण कर्ज येणेबाकी रू. 8 कोटी 13 लाख इतकी आहे व काही कर्जात वसुली चालू आहे. तसेच बँकेचा एकूण व्यवसाय हा रू. 1530 कोटीचा असल्याने या कर्जांची बँकेस तोशीस लागणार नाही अशी आमची खात्री आहे. त्यामुळे प्रसार माध्यमातून बँकेच्या विरोधात प्रसारित होणा-या बातम्यामुळे विचलित न होता बँकेवर विश्वास ठेवावा. बँकेचे सर्व सभासद , ग्राहकांचे बँकेबरोबर असलेले आर्थिक संबंध सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *