News & View

ताज्या घडामोडी

images 1 1

डीएसी शिवाय मिळणार नाही गॅस सिलेंडर!

मुंबई -इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा फटका भारतातील गॅस धारकांना बसत आहे. घरगुती गॅस बुकिंग करूनही मिळतं नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. बुकिंग च्या नावाखाली फसवणूक करण्याचे प्रकार देखील वाढले आहेत. त्यामुळे आता डी ए सी नंबर असल्याशिवाय गॅस मिळणार नाहीये.

नागरिकांना घरगुती गॅस मिळवण्यात अडचणी येत आहेत. गॅस एजन्सीच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेतच. त्यातच बुकिंगच्या नावाखाली फसवणूकही होत आहे. हीच फसवणूक टाळण्यसााठी सरकारने एक नवीन नियम आणला आहे. DAC नंबरच्या या नव्या नियमांमुळे गॅस बुकिंग आणि डिलिव्हरी दरम्यान होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्हाला दिलासा मिळेल.
फसवणुकीपासून वाचवणार नवा नियम –
गॅस सिलेंडर बुक करताना फसवणूक होऊ नये म्हणून प्रत्येक ग्राहकाला डीएसी (DAC) क्रमांक मिळेल. डीएसी क्रमांक (डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड) बुकिंगनंतर तुम्हाला पाठवला जाईल. हा क्रमांक तुम्हाला सिलेंडर घेण्यासाठी डिलिव्हरीच्या वेळी दाखवावा लागेल. हा नवीन नियम आधीच लागू करण्यात आलेला असून याद्वारे ९२ टक्के डिलिव्हरी केल्या जात आहेत. पण काही तांत्रिक अडचणींमुळे अलीकडेच नवीन अपडेट्स करण्यात आले आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ अन् वेगवान झाली आहे.

DAC नंबर कसा मिळणार ? वाचा स्टेप बाय स्पेप प्रोसेस
• गॅस एजन्सीच्या नंबरवरून, IVRS कॉल किंवा एसएमएसद्वारे सिलिंडर बुक करावे. अथवा वितरकाच्या अधिकृत वेबसाइटवरून एलपीजी सिलेंडर बुक करा.
• त्यानंतर डीएसी क्रमांक येण्याची प्रतीक्षा करा. तुमचे बुकिंग निश्चित झाल्यानंतर डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (डीएसी) तयार होईल आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ईमेलद्वारे पाठवला जाईल.
• हा डीएसी (DAC) कोड सुरक्षित ठेवा. हा कोड ओटीपीसारखा आहे. तो कोणाशीही शेअर करू नका. फक्त डिलिव्हरी एजंटलाच द्यावा.
• जेव्हा डिलिव्हरी बॉय तुमच्याकडे सिलेंडर घेऊन येईल, त्यावेळी त्याला हा डीएसी कोड सांगा. डीएसी कोड सांगितल्यानंतर तुम्हाला सिलेंडर मिळेल.
• हे लक्षात ठेवा की तुमच्याकडे DAC क्रमांक नसल्यास, तुम्हाला सिलेंडरची डिलिव्हरी मिळू शकणार नाही.

कोणती तांत्रिक चूक सुधारली ?
गॅस तुटवडा निर्माण झाला त्यावेळी बुकिंगनंतरही अनेकांना डीएसी क्रमांक मिळतच नव्हता. मार्च महिन्यात आलेल्या एका अहवालानुसार, बुकिंग करून पैसे भरूनही अनेक ग्राहकांना ऑथेंटिकेशन कोड मिळत नव्हता. त्यामुळे ग्राहकांना सिलिंडर मिळण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. ही चूक डिझाइनमधील एका त्रुटीमुळे निर्माण झाली होती. कुठूनही बुकिंग केली तरीही, डीएसी कोड फक्त नोंदणीकृत मोबाइल नंबरवरच पाठवला जात होता. आता हा कोड बुकिंगच्या वेळी व्हॉट्सॲप नंबर किंवा ईमेलद्वारे दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *