News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र कृष्ण द्वादशी/ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १४ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२० मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १४ एप्रिल २०२६‼️

मेष:- नियोजित कामात प्रगती साधेल. प्रयत्नपूर्वक सातत्याने कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कराल. मित्र संबंधीतून मदत मिळेल. आध्यात्मिक उपासना लाभदायक होईल.

वृषभ:- नियोजित कामात यश लाभेल. भागिदारीत निर्णय घेतांना सावधानता बाळगावी. मित्रांचे कुटुंबियांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय घेतांना वरिष्ठांचा सल्ला घ्या.

मिथुन:- चांगला दिवस आहे. जबाबदारी व कामाचा ताण वाढेल. हितशत्रुंपासून सावधानता राखावी. नित्यकामामध्ये प्रगती साधेल. विद्यार्थ्यांना चांगला दिवस आहे.

कर्क:- आनंदी दिवस आहे. मनाप्रमाणे नियोजन साध्य करता येईल. कलात्मक क्षेत्रात प्रगती होईल. उपासना पूजा यामध्ये मन लागेल त्यामुळे प्रसन्न राहाल.

सिंह:- नित्य कामात कामात वेळ जाईल. मनाची चंचलता राहील. वरिष्ठांचे मार्गदर्शन महत्वाचे संदेश मिळतील. आर्थिक कामे होतील.

कन्या:- आत्मविश्वासपूर्वक कार्य संपादन कराल. प्रवास कार्यसाधक होतील. नवीन संपर्कातून लाभ मिळतील. संगतीतून लाभ होतील.

तुळ:- जुने राहिलेले कार्य प्रगती साधण्यासाठी दिवस चांगला आहे. आर्थिक लाभ मिळतील. संवादातून प्रतिष्ठा वाढेल सन्मान मिळेल.

वृश्चिक:- उत्साहपूर्वक आत्मविश्वासाने कार्य कराल. सामाजिक क्षेत्रात प्रगती होईल. विचारपूर्वक निर्णय घ्या अवश्यक तेथे वडिलधारी मंडळींचा सल्ला घ्यावा.

धनु:- अनावश्यक खर्च वाढू शकतो. वाणीतील स्पष्टपणामुळे हितशत्रुं सक्रिय होतील. संयमाने कामामध्ये यश लाभेल. कामे मार्गी लागतील.

मकर:- भेटीगाठीतून कार्य साधेल आर्थिक लाभ होतील. मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. सामाजिक कामामधून प्रतिष्ठा सन्मान वाढेल.

कुंभ:- नविन जबाबदारी येवू शकते. व्यवसायात प्रगती होईल. कुटुंबातून सहकार्य लाभेल. चांगले यश मिळेल.

मीन:- कामामध्ये साथ लाभेल. प्रवासातून लाभ मिळतील. धार्मिक कार्यात मन लागेल. आर्थिक कामे होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *