News & View

ताज्या घडामोडी

hq720

नवे बसस्थानक लागले गळायला, गुतेदारांवर कारवाईची मागणी!

बीडकोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले बीडचे बसस्थानक अवकाळी पावसातच बदबदा गळू लागल्याने बीडच्या प्रशासनाचे वाभाडे निघाले आहेत. काझी संघांनी या गुत्तेदार जोडीने केवळ स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यासाठी हे काम घेतले होते अशी चर्चा सुरु झाली आहे. निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी होतं आहे.

बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री पदावर असताना जयदत्त क्षीरसागर यांच्या पुढाकारातून बीडच्या नवीन बस स्थानकाची वास्तू मंजूर झाली होती. कोट्यावधी रुपये यासाठी त्या काळात मंजूर झाले. कायम राजकारणी मंडळींच्या मागेपुढे करणाऱ्या काझी संघाने या गुत्तेदार जोडगळीने बीड सहित मराठवाड्यातील अनेक बस स्थानकांचे काम मिळवले.

मात्र बीडचे काम पूर्ण होण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागला हे काम पूर्ण झाले असले तरी याच्या अधिकृत उद्घाटन अद्याप झालेले नाही अशातच या बस स्थानकामध्ये अनंत अडचणी आणि काम निकृष्ट झाले असल्याच्या तक्रारी समोर येऊ लागले आहेत.

बीड नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या पुढाकारातून बीड शहरात नव्याने सिग्नल उभारण्यात आले हे सिग्नल उभारल्यानंतर त्याची क्रेडिट पंडित यांच्यासहित नगराध्यक्ष व सभापती यांनी घेतले मात्र बुधवारी झालेल्या अवकाळी पावसात नगर रोडवरील सिग्नल अक्षरशः आडवा झाला त्यावरून या कामात प्रत्येकाने किती बारकाईने लक्ष देऊन काम करून घेतले हे समोर आले असून या गुत्तेदारावर देखील कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बुधवारी बीड शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे बस स्थानक अनेक ठिकाणाहून बदाबदा गळू लागले होते त्यामुळे याचे काम किती निकृष्ट झाले असेल हे स्पष्ट होते ज्या गुत्तेदार जोडीने हे काम केले आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *