मुंबई – आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांच्या जीवावर मनमानी कारभार करत बोगस बिले उचलून स्वतःचे घर भरणाऱ्या आणि शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पानसंबळ यांच्या कारभाराची त्याच्या डिग्रीची आणि त्याने मंजूर केलेल्या कामांचे चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल अशी घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानसभेत केली बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री महोदयांनी ही घोषणा केली.
बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणाऱ्या खरवंडी शिरूर कासार या राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण असलेल्या कामाबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. 2018 पासून म्हणजे तब्बल आठ नऊ वर्षापासून या महामार्गाचे काम गुत्तेदार आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रखडले असल्याची माहिती आमदार क्षीरसागर यांनी दिली तसेच 18 महिन्यात पूर्ण करावयाचे काम नव वर्षानंतरही का झाले नाही कामात दिरंगाई करणाऱ्या गुत्तेदार तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का.
ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे अद्याप दिले गेलेले नाहीत ते दिले जाणार का अशी माहिती या लक्षवेधी द्वारे त्यांनी सभागृहात मांडली. तसेच बीड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या महालक्ष्मी चौकामध्ये उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याची उंची वाढवून करण्याची सुशोभीकरण करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
आमदार संदीप शिरसागर यांनी या लक्षवेधी द्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन चे कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ यांच्या बोगस कारभाराची लक्तरे विधानसभेत मांडली आणि यामुळे शासनाची कशी फसवणूक या अभियंत्याने केली आहे हे देखील सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. पानसंबळ नावाचे कार्यकारी अभियंता हे या पदासाठी पात्र नसून त्यांचे शिक्षण डिप्लोमा होल्डर असे आहे. कार्यकारी अभियंता या पदासाठी आवश्यक असलेले शिक्षण देखील पान संबळ यांच्याकडे नसल्याने ते या पदासाठी कार्यक्षम नाहीत, त्यामुळेच ते बोगस कारभाराच्या आधारावर शासनाची फसवणूक करत आहेत असा मुद्दाही आमदार क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
आमदार संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी वर उत्तर देताना बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले की खरवंडी नवगण राजुरी या रस्त्याचे काम मे अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल भूसंपादनाचा प्रश्न देखील तातडीने मार्गी लावला जाईल आणि बोगस कारभार करणारे प्रभारी कार्यकारी अभियंता कृष्णा पान संबळ यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
डिप्लोमा होल्डर असतानाही केवळ आ सुरेश धस यांच्या जीवावर कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज घेणारे आणि अधिकारी, कर्मचारी यांच्यापासून ते लोकप्रतिनिधी यांच्यापर्यंत सर्वांना फाट्यावर मारणारे पानसंबळ यांचा प्रश्न विधानसभेत उपस्थित झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.












Leave a Reply