सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण सप्तमी/ सावित्री बाई फुले स्मृती दिन
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १० मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३२ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १० मार्च २०२६‼️
मेष
आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
आज तुम्हाला कामात अधिक जबाबदाऱ्या मिळू शकतात. दिवसभर थोडी धावपळ होईल, पण तुमच्या मेहनतीमुळे काम पूर्ण होईल.
वरिष्ठांचे लक्ष तुमच्या कामावर राहील.
घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या सल्ल्याची गरज भासेल.
रात्रीपासून जोडीदाराशी गोड संवाद वाढेल.
धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो.
वृषभ
आज पंचमात चन्द्र आहे.
आज मन शांत आणि स्थिर राहील. घरातील कामे नीट पार पडतील.
खर्चावर नियंत्रण राहील, छोटा आर्थिक लाभ संभव.
कुटुंबातील सदस्यांसोबत आनंददायी वेळ.
जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.
आहार संतुलित ठेवा.
.
मिथुन
आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.
आज संवादकौशल्यामुळे अनेक कामे सोपी होतील.कामात बारकाई आवश्यक.
सहकाऱ्यांसोबत चांगले समन्वय राहील.
नवीन संधी मिळू शकते.
प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी संभाषण.
झोप पूर्ण घ्या.
कर्क
आज तृतीयात चन्द्र आहे.
भावनिक संवेदनशीलता वाढेल. कुटुंबाकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
अचानक खर्च उदभवण्याची शक्यता.सहकाऱ्यांशी संवाद चांगला ठेवल्यास कामे लवकर पूर्ण होतील. काही जणांना नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
घरातील एखादा निर्णय तुमच्या हातात येऊ शकतो.
नात्यात समजूतदारपणा आवश्यक.
सिंह
आज धनस्थानी चन्द्र आहे.
आज समाजात तुमचे व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील.
वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता.
एखादा आनंदाचा प्रसंग.
जोडीदाराची साथ मिळेल.खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. योग्य नियोजन केल्यास भविष्यात फायदा होईल.
कन्या
आज
चंद्र आपल्या राशीत असल्यामुळे आज मन आनंदी राहील आणि विचार स्पष्ट राहतील.आज कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि कौशल्य दिसून येईल. वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
रेंगाळलेली कामे पूर्ण करण्यासाठी योग्य दिवस.
संवादातून नात्यात विश्वास वाढेल.
विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.
तुळ
आज दिवसभर चन्द्र व्यय स्थानी आहे.कामाच्या ठिकाणी संयम ठेवणे महत्त्वाचे आहे. काही कामे अपेक्षेपेक्षा उशिरा पूर्ण होऊ शकतात.सौंदर्य, घरगुती वस्तू किंवा कपड्यांवर खर्च होण्याची शक्यता आहे. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत.
रात्रीपासून चंद्र आपल्या राशीत येईल, त्यामुळे आत्मविश्वास आणि आकर्षण वाढेल.
नवीन संधी मिळण्याची शक्यता.
रोमँटिक क्षण अनुभवायला मिळतील.
वृश्चिक
आज लाभस्थानी चन्द्र आहे.मित्र किंवा जवळच्या व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळू शकते.आर्थिक बाबतीत
आज संयम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.नवीन ओळखीमुळे फायदा होण्याची शक्यता आहे.
स्पर्धात्मक वातावरण राहील.
आज कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे.
धनु
आज दशम स्थानी चन्द्र आहे.
सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. नवीन योजना आखण्यासाठी चांगला दिवस.
आर्थिक लहान लाभ संभव.
जोडीदाराशी आनंददायी वेळ.आज खर्च थोडा वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः घरातील गरजा किंवा कुटुंबासाठी काही वस्तू घेण्यावर पैसे जाऊ शकतात. मोठे आर्थिक निर्णय घेण्याआधी विचार करणे योग्य ठरेल.
कामानिमित्त छोटा प्रवास होऊ शकतो.
मकर
आज भाग्यात चन्द्र आहे.
कामात जबाबदाऱ्या वाढतील.नवीन योजना, शिक्षण, प्रवास किंवा महत्त्वाचे निर्णय यासाठी दिवस चांगला राहील.
मेहनतीचे फळ मिळेल पण थोडा संयम आवश्यक.
खर्चावर नियंत्रण ठेवा.
नात्यात शांतता राखा.
कुंभ
आज अष्टम स्थानी चन्द्र आहे.आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक आहे. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे.काही कामे अपेक्षेपेक्षा जास्त वेळ घेऊ शकतात.
नवीन कल्पना आणि सर्जनशील विचार वाढतील.
तांत्रिक किंवा सर्जनशील क्षेत्रात प्रगती.
मैत्री अधिक मजबूत होईल.
मीन
आज सप्तमात चन्द्र आहे.त्यामुळे नातेसंबंध, भागीदारी आणि इतरांशी व्यवहार याकडे अधिक लक्ष जाईल. काही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागू शकते.
मन आध्यात्मिकतेकडे झुकू शकते.
घरात शांत वातावरण राहील.
आर्थिक दृष्टीने मध्यम लाभ.












Leave a Reply