बीड -जिल्हा न्यायालयात वकील राम डोंगरे यांना मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्याबाबत बार कॉन्सिल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जागे झालेल्या शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने आरोपी राधाकिसन करपे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. विशेष म्हणजे जिल्हा न्यायालयातील एकाही वकिलांनी त्याचे वकीलपत्र नाही घेत आपली एकजूट दाखवून दिली.
बीड जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करणारे ऍड राम डोंगरे हे आपले कामकाज करत बसले असताना दुपारीच बारा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास राधाकिसन करपे आणि तीन चार महिला आणि पुरुष त्यांच्याकडे आले.
या लोकांनी अचानक बाचाबाची आणि शिवीगाळ करत वकील डोंगरे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर वकिलांनी हा सगळा प्रकार न्यायाधीश यांच्या कानावर घालून शिवाजीनगर पोलिसात धाव घेतली.
तब्बल चोवीस तासापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर देखील गुन्हा दाखल नाही झाल्याने वकिलांनी न्यायालयाच्या दारात आंदोलन केले होते. तसेच या प्रकरणी महाराष्ट्र बार कॉन्सिल ने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे धाव घेतली होती
थेट गृहमंत्री यांनी या प्रकरणी लक्ष घातल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने आरोपी करपे याला अटक केली. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील अन्य चार ते पाच आरोपी अद्यापही फरार आहेत.












Leave a Reply