News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

बांधकाम विभागाला झालाय पैसे खाण्याचा भस्म्या रोग!

बीड-जिल्हा परिषदेच्या बांधकामं विभागाचे कार्यकारी अभियंता सय्यद मोमीन आणि कर्मचाऱ्यांना पैसे खाण्याचा भस्म्या रोग झाला आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे. डेमो हाऊस प्रकरणात दोन वेगवेगळ्या वर्क ऑर्डर काढून दहा लाख रुपये घशात घालणाऱ्या या अधिकाऱ्यांनी संरक्षक भिंत आणि फर्निचर साठी सतरा लाख रुपयांच्या वर्क ऑर्डर काढल्या आहेत. शासनाच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होतं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अनिश्चित काळासाठी राज्यातील उर्वरित जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मर्जी पुढील काही महिने राहणार असल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असुन जनतेच्या पैशातून अनावश्यक कामांसाठी निधी देऊन मर्जीतील कंत्राटदार पोसण्याचे काम सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत अनावश्यक बाबी ऐवजी अत्यावश्यक बाबींसाठी निधी खर्च करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे सीईओ जतिन रहेमान आणि जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे केली आहे.

img 20260226 wa00216349442548371225444
img 20260226 wa00226258835445814209836

१७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने  १० लाख आणि ७ लाख अशा दोन प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. यातील एका कामाचे स्वरूप पंचायत समिती आवारातील अधिकारी कर्मचारी निवासस्थानांची संरक्षण भिंत बांधणे असे आहे.या कामाची रक्कम ९ लाख ९९ हजार ८९५ रुपये इतकी आहे तर जिल्हा परिषद नविन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचर व विविध कामे करणे या कामासाठी ६ लाख ८६  हजार २७१ रुपयांची प्रशासकीय मान्यता अर्थात कार्यारंभ आदेश दिलेला आहे.

जिल्हा परिषदेत २०२३ पासुन प्रशासक असल्याने
आधिका-यांवर कोणाचाही वचक राहिलेला नाही.त्यामुळे अधिकारी मर्जीतील कंत्राटदार पोसण्यासाठी निधी खर्च करताना दिसत आहेत. एकीकडे जिल्हा परिषदेच्या मुख्य ईमारतीला संरक्षण भिंत नाही जी होती पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ ती पाडण्यात आली. वास्तविक पाहता ही भिंत तातडीने बांधणे आवश्यक आहे.मात्र असे न करता पंचायत समितीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाला संरक्षण भिंत बांधण्याचा घाट आधिका-यांनी घातला आहे.

जिल्हा परिषद आवारात ज्या ठिकाणी लाईटचे मीटर आहे त्याठिकाणी एक छोटी फर्निचरची खोली करण्यात येणार आहे.व विविध कामांमध्ये जिल्हा परिषदेच्या गेट समोरील  मोकळ्या जागेत तारेचे कंपाऊंड आणि हिरवळ करण्यात येणार आहे मात्र मुळात निवडण्यात आलेली जागाच चुकीची असुन  लोकप्रतिनिधी नसल्याने आणि केवळ प्रशासकीय राज असल्याने अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचे दिसून येत असुन संबंधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख बीड जिल्हा माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी याबाबत सीईओ जितिन रहेमान आणि जिल्हाधिकारी नवनित कांवत यांना लेखी तक्रारी द्वारे अनावश्यक बाबी टाळुन आवश्यक त्या ठिकाणी निधीचा वापर करण्याची विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *