News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल दशमी / स्वातंत्र्यवीर सावरकर पुण्यतिथी
🌸 नक्षत्र…. मृगशीर्ष
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २६ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक २६ फेब्रुवारी २०२६‼️

मेष: आत्मविश्वासाने उत्साह वाढेल. कामामध्ये प्रगती साधेल. संवादातून पूर्वग्रहाने झालेले अडथळे दूर होतील. आनंदी दिवस आहे.

वृषभ: अनपेक्षित खर्च संभवतो खर्चाचे योग्य नियोजन करा. कौटुंबिक अपेक्षित मदत होईल. मित्र परिवारात चांगले संबंध प्रस्थापित होतील.

मिथुन: नविन कामामध्ये नियोजन कराल. सहकार्यांच्या मदतीने नविन आराखडा तयार होईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कौटुंबि वातावरण चांगले राहील.

कर्क: संयमाने घ्या. घाईगर्दीत महत्वाचे निर्णय घेऊ नका. विचारपूर्वक कृती लाभदायक होईल. जोडीदाराकडून आधार लाभेल. आध्यात्मिकतेतून आत्मविश्वास वाढेल.

सिंह: मनाची चलबिचल होईल. अनावश्यक खर्च होऊ शकतो. फारशी अनुकूलता नाही. ध्यान प्राणायाम करा. सकारात्मक विचार करावेत, महिला अधिक भावनिक होतील.

कन्या: आनंदी दिवस आहे. मित्र नातेवाईक यांची भेट होईल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. आर्थिक बाबतीत लाभदायक दिवस. घरात आनंदाचे वातावरण.

तुला: नात्यातील दुरावा संवादाने कमी होईल. वरिष्ठांचा सल्ला लाभदायक होईल. काही खरेदी होईल. आर्थिक योग चांगले आहेत.

वृश्चिक: नविन कामामध्ये रुची निर्माण होईल. योग्य सल्ला मिळेल.परिश्रमाचे फळ मिळेल. जबाबदारी पार पाडाल. चांगला दिवस आहे.

धनु: नायोजनात्मक कामामध्ये यश मिळेल. उपासना धार्मिक कार्य घडेल. दानधर्माने मानसिक स्थैर्य लाभेल. कामानिमित्त प्रवास घडू शकेल.

मकर: मौनं सर्वार्थ साधनम समोरचा काय सांगतो ते ऐकून घ्या. लगेच प्रतिक्रिया देऊ नका. काही मतभेद होऊ शकतात. शांतता राखा. ध्यान प्राणायामाने मनाची प्रसन्नता वाढवता येईल.

कुंभ: नविन जबाबदारी घ्याल. तुमची निर्णयक्षमता उत्तम राहील. त्यामुळे यशाच्या जवळ जाल. नवे मित्र कामामध्ये जोडले जातील. सामाजिक कामामध्ये प्रतिष्ठा मिळेल.

मीन: चांगला दिवस आहे. कामामध्ये लक्ष लागेल. धार्मिक गोष्टी घडतील. आर्थिक कामे होतील. परिवारीक जीवन चांगले असेल. सुखसंवादाचा योग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *