News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1772011011685

फडणवीस साहेब न्याय मागणे गुन्हा आहे का,आंदोलन कर्त्यांचा मंडप पोलिसांनी काढला!

बीड -तब्बल चाळीस दिवसापूर्वी मृत्यूमुखी पडलेल्या जी एस टी अधिकारी सचिन जाधवर यांच्या प्रकरणात न्याय मागण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या जाधवर कुटुंबाने उभारलेला मंडप पोलिसांनी दमदाटी करत काढून टाकला. एकीकडे चाळीस दिवस झाले तरी आरोपी अटक करण्यात यश येतं नसलेले बीड पोलीस आंदोलन करणाऱ्यांवर दमबाजी करून कसली मर्दूमकी दाखवत आहेत असा सवाल विचारला जातं आहे.

जी एस टी अधिकारी सचिन जाधवर यांचा मृतदेह चाळीस दिवसापूर्वी कपिलधार घाटात सापडला होता. हा सगळा प्रकार संशयास्पद असाच होता. मात्र बीड पोलिसांना यात काहीच गैर वाटले नसावे. त्यामुळेच आठ दिवसानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

fb img 17720110046192516582818644926385

त्यानंतर आरोपी प्रदीप फाटे हा पोलिसांना अद्याप सापडलेला नाही. जाधवर यांचे कुटुंबीय ग्रामीण पोलिसांच्या दारात तासन तास बसल्यानंतर फाटेवर गुन्हा दाखल झाला होता.

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यात आंदोलन करणाऱ्या नागरिकांना किंवा न्याय मागण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना धमाकावले जात असेल किंवा मंडप काढून टाकला जातं असेल तर न्याय मागायचा कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आंदोलक हे भारतीय नागरिक आहेत, अतिरेकी किंवा नक्षलवादी नाहीत तरीही बीड पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याना वागणूक दिली ती फडणवीस यांची इमेज डॅमेज करणारी आहे.

एकीकडे क्यू आर कोडं जनरेट करून तक्रार करा म्हणणारे बीडचे पोलीस प्रत्यक्षात दाद मागण्यासाठी आलेल्यांची फिर्याद मात्र आठ आठ दिवस घेत नाहीत हा मोठा जोक आहेदरम्यान जाधवर यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणासाठी बसले, तेव्हा त्यांनी तेथे कंपाउंड वाल ला लागून मंडप उभारला. मात्र त्याठिकाणी काही वेळातच आलेले बीड शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी मंडप काढून टाकत आंदोलकानाचं गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली.

हा सगळा प्रकार झाल्यानंतर उपस्थित आंदोलकांनी उन्हात आंदोलन सुरु केले. मात्र पोलिसांनी आपला हाच जोर फाटे या आरोपीला पकडण्यासाठी वापरला असता तर बरे झाले असते अशी चर्चा सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *