News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल पंचमी
🌸 नक्षत्र…. अश्विनी
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २२ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. सायं. ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक २२ फेब्रुवारी २०२६‼️

मेष
आज
आज मन पटकन चिडचिडे होऊ शकते. घरातील जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक इच्छा यामध्ये द्वंद्व जाणवेल. मंगळाचा प्रभाव असल्याने बोलताना शब्द जपून वापरा. गुरु-चंद्र युतीमुळे अनुभवी स्त्री किंवा आईसमान व्यक्तीकडून योग्य सल्ला मिळेल. पाठीचा त्रास, डोकेदुखी जाणवू शकते.

वृषभ
आज
आर्थिक बाबी आज केंद्रस्थानी राहतील. खर्च वाढेल पण आवश्यक असेल. स्त्रियांसाठी दागिने, सौंदर्यसामग्री किंवा घरसजावटीकडे ओढ राहील. नातेसंबंधात अधिकार गाजवू नका. जोडीदाराशी संवाद सौम्य ठेवा.

मिथुन
आज
चंद्र व गुरु तुमच्याच राशीत असल्याने आज तुमचे महत्त्व वाढेल. आत्मविश्वास चांगला राहील, पण रवी प्रतियुतीमुळे निर्णय घेताना संभ्रम राहू शकतो. महिलांसाठी स्वतःचे विचार स्पष्ट मांडण्याची गरज आहे. लेखन, बोलणे, शिक्षण या क्षेत्रात यश मिळेल.

कर्क
आज
आज भावना खोलवर हलतील. जुन्या आठवणी, अपूर्ण इच्छा मनात येतील. महिलांनी स्वतःला कमी लेखू नये. गुरुचा आशीर्वाद संरक्षण देतो. घरातील वातावरण सुधारण्यासाठी पुढाकार घ्या.
द्या.

सिंह
आज
सामाजिक वर्तुळात सक्रिय राहाल. नेतृत्वगुण दिसून येतील. मात्र मंगळ-चंद्र योगामुळे हट्टीपणा वाढू शकतो. महिलांसाठी समूहात काम करताना संयम आवश्यक. मुलांकडून आनंद मिळेल.

कन्या
आज
कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील. पुरूष व महिलांना करिअर व घर यामध्ये समतोल साधावा लागेल. वरिष्ठ महिलांकडून मार्गदर्शन मिळेल. पचनसंस्था व झोपेची काळजी घ्या.

तुळ
आज
भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, अध्यात्म, प्रवास यासाठी उत्तम दिवस. स्त्रियांसाठी स्वतःच्या प्रगतीचा विचार करण्याची संधी. प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद ठेवा.

वृश्चिक
आज
भावनिकता वाढेल. संशय आणि असुरक्षितता टाळा. आर्थिक व्यवहार आज सावधपणे करा. महिलांनी गुप्त चिंता कोणाशी तरी शेअर केल्यास मन हलके होईल.

धनु
आज
गुरु-चंद्र युतीमुळे वैवाहिक व भागीदारी संबंध सुधारतील. विवाहित महिलांसाठी समजूतदारपणा वाढेल. कायदेशीर किंवा कराराचे काम यशस्वी होऊ शकते.

मकर
आज
कामाचा ताण असला तरी त्याचे फळ मिळेल. महिलांसाठी कुटुंब व नोकरी दोन्ही सांभाळण्याचा दिवस. पाय व गुडघ्यांची काळजी घ्या.

कुंभ
आज
सर्जनशीलता वाढेल. कला, छंद, मुलांशी संबंधित आनंद मिळेल. आज प्रेमात गोडवा वाढेल. आत्मविश्वास वाढेल.

मीन
आज
घरगुती विषय प्राधान्याने येतील. आई, सासू किंवा ज्येष्ठ स्त्रीकडून आधार मिळेल. भावनिक संवेदनशीलता वाढेल पण गुरु संरक्षण देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *