मुंबई -राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने परळी येथे येत्या 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान भव्य पशु प्रदर्शन एक्सपो चे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत सर्व अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मंत्री पंकजा मुंडे यांनी संवाद साधला आणि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सूचना दिल्या.
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने येत्या 13, 14 आणि 15 फेब्रुवारी रोजी परळी वैजनाथ येथे राष्ट्रीय स्तरावरील ऐतिहासिक भव्य पशु प्रदर्शन ‘MahaExpo’ आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या पूर्वतयारी भाग म्हणून आज मराठवाड्यातील सर्व पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पोलिस प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सविस्तर आढावा घेतला तसेच प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी प्रशासनास निर्देश दिले.
सदर बैठकीस जिल्ह्यासह राज्यातील पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
प्रदर्शन हे यशस्वी आणि प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली.
या प्रदर्शनात राज्यासह देशभरातून विविध जातींचे जातिवंत व उत्कृष्ट पशुधन प्रदर्शित केले जाणार असून पशुसंवर्धन क्षेत्रातील व्यावसायिक तज्ञ व विविध संस्थांचे स्टॉल लावले जाणार आहेत.
परळी वैद्यनाथ येथे होणारा हा पशुधन एक्सपो राज्यातील पशुपालक उद्योजक व संशोधक यांच्यासह शेतकरी व सामान्य नागरिकांसाठी एक प्रेरणादायी व ऐतिहासिक सोहळा ठरणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.












Leave a Reply