News & View

ताज्या घडामोडी

reti mafia 1646980323

पंडितांच्या गेवराईत वाळू माफिया माजले, राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय सहकार्यामुळे वाळू तस्करी जोमात!

बीड – गेवराई तालुक्यातील गोदाकाठावर वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. राजकीय वरदहस्त असल्याने रात्री अपरात्री वाळूची तस्करी केली जातं आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या तोंडावर अन डोळ्यावर पैशाची पट्टी बांधलेली असल्याने कारवाई शून्यच असल्याचे चित्र आहे.

बीड जिल्ह्यातील बीड आणि गेवराई या दोन तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी आणि सिंदफणा या नदीपात्राला यावर्षी मोठ्या प्रमाणात पूर आला होता त्यामुळे या दोन्ही नदीच्या काठावर असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात वाळू साठा निर्माण झालेला आहे. गेवराई तालुक्यातील सावरगाव येथील वाळूचे टेंडर शासनाने काढले मात्र ज्यांना हे टेंडर भेटले ते राजकीय नेते वाळूचा अक्षरशः दिवस-रात्र उपसा करून माफियागिरी करू लागले आहेत.
सावरगाव येथे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार मजुरांकरवी वाळू उपसा करणे बंधनकारक असताना पाण्यातील बोटी आणि केन्या याच्या माध्यमातून हजारो ब्रास वाळू उपसा सुरू आहे. मात्र याकडे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन या दोन्हीचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
सावरगाव येथून वाळू भरून द्यायचे असल्यास ऐंशी हजार रुपयात तीन ट्रिप वाळू भरून दिली जाते मात्र पावती एकाच ट्रिप ची मिळते याचाच अर्थ शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून रोज करोडो रुपये छापण्याचा उद्योग राजकीय पुढारी करू लागले आहेत. सावरगाव येथील वाळू उपसा नियमानुसार होत नसल्याने सदर टेंडर बंद करून घेणे आणि बोटी जप्त कराव्यात अशी मागणी होत आहे
एका ट्रक किंवा हाय वाला एकाच पावतीवर एक खेप करता येते परंतु राजकीय हस्तक्षेप आणि आशीर्वाद यामुळे टेंडर मालक 80 हजार रुपये घेऊन तीन खेपा करण्यास सांगतो तीन खेपाचे 80 हजार टेंडर मालकाला द्यायचे त्यानंतर दहावीच हजार तहसीलदार आणि इतरांना वाटायचे तसेच पाच पन्नास हजार रुपये पोलीस उपाधीक्षकापासून ते बीड अंमलदारापर्यंत वाटप करायचे त्यामुळे बहुतांश हवा चालकांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *