सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल गणेश जयंती/ तीळकुंद जयंती / वरद चतुर्थी
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. २२ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २२ जानेवारी २०२६ ‼️
मेष
आज दशमस्थानी चन्द्र आहे.
आज थोडे गंभीर रहाल. घर-काम आणि जबाबदाऱ्या वाढू शकतात. जोडीदाराशी किंवा कुटुंबातील व्यक्तीशी मनमोकळा संवाद ठेवा. आर्थिक बाबतीत संयम ठेवा.कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
वृषभ
आज भाग्यस्थानी चन्द्र आहे.
आज भाग्याची साथ मिळेल. शिक्षण, प्रवास, नवीन कल्पना यामध्ये यश मिळेल. प्रेमसंबंधात भावनिक जवळीक वाढेल.
मिथुन
आज अष्टमस्थानी चन्द्र आहे.
आज मनात असुरक्षितता जाणवू शकते. आर्थिक व्यवहारात सावध राहा. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. ध्यान, प्राणायाम उपयुक्त ठरेल.वाहन जपून चालवा.
कर्क
आज सप्तमस्थानी चन्द्र आहे.पती पत्नी कडून भेटवस्तू मिळू शकते.रोमँटिक दिवस अनुभवायला येईल.
आज नात्यांचा दिवस आहे. नवरा बायको/सहकारी/मित्र मैत्रिणीसोबत भावनिक चर्चा होईल. जुन्या मतभेदांवर तोडगा निघू शकतो.
सिंह
आज षष्ठस्थानी चन्द्र आहे. सहकारी सहकार्य करतील.त्यांच्या मार्फत लाभ घडेल.
कामाचा ताण वाढेल, पण बुध-शनी योगामुळे महिलांना संयम आणि शहाणपणाने यश मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या
आज पंचमस्थानी चन्द्र आहे.
आज सर्जनशीलता वाढेल. मुलांशी, प्रिय व्यक्तीशी भावनिक नाते घट्ट होईल.बोलण्यातून, प्रवासातून अनपेक्षित लाभ होतील. महिलांसाठी कला, लेखन, डिझाईनमध्ये चांगला दिवस.
तुळ
आज चतुर्थस्थानी चन्द्र आहे.
घर, कुटुंब, आईशी संबंधित विषय महत्त्वाचे ठरतील.घरातल्या सजावटीसाठी खर्च कराल.बागकामाचा आनंद घ्याल. भावनिक चढ-उतार जाणवू शकतात. संयम ठेवल्यास दिवस सकारात्मक जाईल.
वृश्चिक
आज तृतीयस्थानी चन्द्र आहे.
आज संवादशक्ती वाढेल. भावंडे, शेजारी यांच्याशी चर्चा होईल. गुप्त प्रेम किंवा आकर्षण वाढण्याची शक्यता.अचानक शुभ समाचार मिळू शकतो.
धनु
आज धनस्थानी चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत लाभ होईल, पण खर्चही वाढेल.कौटुंबिक कारणास्तव खर्च कराल.गायक,वक्तृत्व क्षेत्रात उत्तम यश मिळेल. आत्ममूल्यांची जाणीव होईल. सौंदर्य, दागिने, कपडे खरेदीसाठी दिवस चांगला.
मकर
आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल . स्वतःबद्दल नवीन निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. मोठे आर्थिक बदल घडतील.प्रगती होईल.व्यक्तिमत्त्वात बदल जाणवेल.कणखरपणा दाखवाल. स्वतःसाठी खर्च कराल.
कुंभ
आज व्ययस्थानी चन्द्र आहे.आर्थिक लाभ होतील.अचानक प्रवास घडेल.
एकांताची गरज भासेल. जुने विचार, आठवणी मनात येतील. आध्यात्मिक साधनेसाठी उत्तम दिवस.
मीन
आज लाभस्थानी चन्द्र आहे.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळू शकते.
मित्रमैत्रिणींशी सम्पर्क होईल . सामाजिक कामातून समाधान मिळेल. महिलांना नवीन ओळखी फायदेशीर ठरतील.












Leave a Reply