बीड –बीड नगर पालिकेच्या पहिल्याच सभेत स्वीकृत सदस्य निवडीवरून मोठा राडा पहायला मिळाला. नियमानुसार भाजप चे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि शरद पवार गटाचा एक नगरसेवक निवडून येणं अपेक्षित असताना नगराध्यक्षा यांनी दादागिरी करत त्यांच्या पक्षाचे तीन नगरसेवक निवडून आणले असा आरोप भाजपच्या गटनेत्या डॉ सारिका क्षीरसागर यांनी केला. या दादागिरी विरुद्ध आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणारं असल्याची माहिती त्यांनी दिली.
बीड नगर परिषदेच्या उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य निवडीसाठी गुरुवारी 15 जानेवारी रोजी बैठकीचे आयोजन केले होते. आ संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्याकडून विनोद मुळूक यांनी अर्ज भरला तर भाजपकडून डॉ सारिका क्षीरसागर यांनी अर्ज भरला.
वेळपूर्वी डॉ क्षीरसागर यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने मुळूक यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर स्वीकृत सदस्य निवड झाली. मात्र यामध्ये नगराध्यक्षा यांनी दादागिरी करत त्यांच्या पक्षाचे तीन, भाजप आणि शरद पवार गटाचा एक एक सदस्य निवडला. हा सगळा प्रकार घटनाबाह्य असल्याचा आरोप डॉ सारिका क्षीरसागर यांनी केला.
या विरोधात आपण भाजप गटनेता म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच नगर विकासमंत्री यांच्याकडे तक्रार करणारं असल्याचे त्यांनी सांगितले.












Leave a Reply