News & View

ताज्या घडामोडी

IMG 20251229 WA0050 1 scaled

भर रस्त्यावर खाजगी व्यक्तीने लावले पोल!नगर पालिका झोपेत!

बीड -शहरातील नेत्रधाम परिसरात असलेल्या सिमेंट रोडवर एका खाजगी व्यक्तीने स्वतःच्या नावाची कमान उभारली असून रस्त्यावर मोठ्या वाहनांना अडसर होईल असे लोखण्डी पोल लावल्याने नगर पालिका प्रशासन झोपले आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

बीड नगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने मनमानी कारभार सुरू आहे. नगरपालिकेचा बांधकाम विभाग म्हणजे केवळ गुत्तेदार पोहोचण्याचे उद्योग करणारा विभाग झाला आहे. नगरपालिकेच्या कारभारावर कोणाचेच लक्ष नसल्यामुळे शहरातील नेत्रधाम स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालय कडे जाणाऱ्या सिमेंट रस्त्यावर खाजगी व्यक्तीने मोठी कमान उभारली आहे.

विशेष बाब म्हणजे या रस्त्यावरून ट्रक टेम्पो किंवा इतर मोठी वाहने जाऊ नयेत अथवा त्यांना अडचण व्हावा यासाठी लोखंडी पोल रस्त्यात लावण्यात आलेले आहेत. ज्यामुळे वाहतुकीस देखील अडथळा निर्माण होऊ शकतो. याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी तक्रारही केली होती मात्र त्यांनी सोयीस्करपणे दुर्लक्ष केले आणि आता या व्यक्तीने कमान उभारून आणि पोल उभा करून रहदारीस अडथळा आणला असल्याने प्रशासन झोपेत आहे की काय अशी चर्चा होऊ लागली आहे.

नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून हा रस्ता बांधण्यात आला असल्याची माहिती आहे या रस्त्याचा दर्जा पाहिल्यानंतर केवळ गुत्तेदार पोहोचण्यासाठीच रस्ता केला असावा आणि यातून बांधकाम विभागाचे अभियंता आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे हात ओले झाले असावेत अशी चर्चा आहे शहरातील मुख्य रस्त्यावर जर अशा पद्धतीने अवैधपूर उभा केले जाणार असतील तर पोल उभा करणाऱ्या व्यक्तीवर नगरपालिका प्रशासन कारवाई करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *