सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 उत्तरायण 🌕 पुष्य शुक़्ल प्रतिपदा
🌸 नक्षत्र…. पु.षाढा
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. २१ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २१ डिसेंबर २०२५‼️
मेष
आज
आज संसारात जबाबदाऱ्या वाढतील. पतीशी संवाद महत्त्वाचा ठरेल. गैरसमज टाळण्यासाठी शांतपणे बोला. सासर-माहेर दोन्हीकडील विषय एकाच वेळी हाताळावे लागतील.मोबाईल किंवा इतर गॅझेट सांभाळा.
वृषभ
आज
वैवाहिक नात्यात समजूतदारपणा वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. घरातील आर्थिक चर्चा सकारात्मक होतील. स्त्रीपुरुष साठी आज स्थैर्याचा दिवस.
मिथुन
आज
घरकाम, मुलं आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या यामध्ये धावपळ होईल. मनात दडलेली गोष्ट बोलून दाखवण्याची संधी मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
कर्क
आज
आज मन जरा हळवे राहील. कुटुंबातून भावनिक आधार मिळेल. जुन्या आठवणींमुळे डोळे पाणावू शकतात. घरात शांततेसाठी संयम ठेवा.
सिंह
आज
घरातील निर्णयांमध्ये तुमचा शब्द महत्त्वाचा ठरेल. सासू-सासऱ्यांशी संवाद वाढेल. स्त्री म्हणून तुमचे नेतृत्वगुण दिसून येतील.
कन्या
आज
घरातील लहानसहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो. शब्द जपून वापरा. पतीशी स्पष्ट संवाद ठेवल्यास प्रश्न सुटतील.
तुळ
आज
कौटुंबिक सुखद वातावरण राहील. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन होईल. पतीकडून कौतुक होऊ शकते.
वृश्चिक
आज
आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावना तीव्र असतील. स्त्रीला स्वतःकडे लक्ष द्यावेसे वाटेल. आत्मविश्वास वाढेल, पण हट्टीपणा टाळा.
धनु
आज
मनात न बोललेल्या भावना साचतील. पतीशी मनमोकळा संवाद आवश्यक आहे. आज जरा अंतर्मुख राहाल.
मकर
आज
घरातील जबाबदाऱ्या नीट सांभाळाल. कुटुंबाचा आधार मिळेल. भविष्याबाबत चर्चा होऊ शकते.प्रवासाचे योग.
कुंभ
आज
संसार आणि सामाजिक जबाबदाऱ्या एकत्र सांभाळाव्या लागतील. तुमचा सल्ला घरात मानला जाईल.
मीन
आज
घरात सकारात्मक वातावरण राहील. धार्मिक किंवा आध्यात्मिक कल राहील. पतीशी भावनिक जवळीक वाढेल.












Leave a Reply