News & View

ताज्या घडामोडी

IMG 20251116 WA0030

राष्ट्रवादी ला सोडचिठ्ठी देऊन योगेश क्षीरसागर भाजपात दाखल!

बीड -नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

डॉ योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून लढवली होती. पराभव झाल्यानंतर डॉ क्षीरसागर यांच्या विरोधात स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात गटबाजी उफाळून आली होती. याबाबत त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे तक्रार केली होती.

मात्र पक्षाने नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा याबाबत दखल घेतली नाही. त्यामुळे डॉ क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर रविवारी दुपारी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि मंत्री पंकजा मुंडे, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.

यावेळी डॉ सारिका क्षीरसागर, शुभम धूत यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *