News & View

ताज्या घडामोडी

download 2

मोठी घडामोड!योगेश क्षीरसागर यांचा राजीनामा!

बीड – राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा देत पक्षाला जोरदार धक्का दिला आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय प्रक्रियेत आपल्याला वारंवार डावले जात असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे डॉक्टर क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू असताना बीडमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. 2024 ची विधानसभा अजित पवार गटाकडून लढवलेले डॉक्टर योगेश शिरसागर हे पराभवानंतरही अजित पवार गटात सक्रिय होते.

नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्याकडे बीड विधानसभा मधील स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व सूत्रे येतील अशी अपेक्षा त्यांना होती मात्र बीड मधील अजित पवार गटात असलेली गटबाजी दिसल्यानंतर डॉक्टर शिरसागर यांनी याबाबत पक्षश्रेष्ठींच्या कानावर अनेक वेळा ही गोष्ट घालण्याचा प्रयत्न केला मात्र त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.

बीड नगरपालिकेच्या उमेदवारी निश्चिती बाबतची सर्व सूत्रे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे दिल्यानंतर नाराज झालेल्या डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आपल्या बीड विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.

नगरपालिका निवडणुकीत डॉक्टर योगेश शिरसागर यांनी अजित पवारांचे साथ सोडल्याने आता ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत बीड विकास आघाडी करून लढणार की स्वतंत्रपणे आपली ताकद दाखवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *