जालना -माजीमंत्री धनंजय मुंडे यांचा पीए किंवा कार्यकर्ता असणारा कांचन नावाचा माणूस आपल्या हत्येच्या सुपारी प्रकरणात प्रमुख असून त्याच्यासह धनंजय मुंडे यांची सुद्धा ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांनी थेट धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याने खळबळ उडाली आहे.
हत्येचा कट रचल्या प्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आल्यानंतर जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत खळबळजनक खुलासे केले. ते म्हणाले कि,मराठा समाजाने शांत राहावे. आज मी जे सांगणार आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. काल घडलेल्या घटनेमुळे खरा संदेश देणे गरजेचे आहे. मी आहे तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावे. मी लढायला तयार आहे. आपले हात खूप लांब आहेत, हे त्यांना आता कळले असेल. सतर्क राहा, सावध राहा आणि हुशार व्हा.”
“मराठा समाजातील राज्यातील सर्व नेत्यांनी हा विषय गंभीरपणे घ्यावा. वेळ तुमच्यापुढेही येऊ शकते. तुमच्यावरही संकट येऊ शकते. विरोधक जाऊन भाषण करणे परवडते, पण कुणाच्या सांगण्यावरून जीवावर उठणे… आजचा विषय अत्यंत गंभीर आहे. आरक्षण, राजकारण, विरोध हे वेगळ्या गोष्टी आहेत. ‘करून घेण्यापेक्षा’ करणारा जबाबदार असतो. अशा नीच वृत्तीचा नायनाट करावा लागेल. सर्वांनी हा विषय ताकदीने लावून धरला तरच नायनाट होईल.”
“पोलिसांनी आरोपींना पकडले किंवा सोडले, आम्हाला त्यात काही करायचे नाही. बीड जिल्ह्यातील प्रमुख नेते बसले होते. जनतेच्या कोर्टात खरे काय आहे हे सर्वांना माहीत आहे. कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. प्रशासकीय बाबतीत मी बोलणार नाही. बीडचा एक कार्यकर्ता किंवा पी.ए. दोन आरोपींकडे गेला. त्या दोघा आरोपींनी आणि बीडच्या पी.ए.ने हे संपूर्ण काम नेले. घटनाक्रम येथून सुरू झाला.
पहिला मुद्दा – खोटा व्हिडिओ बनवा.
दुसरा – खून करा.
तिसरा – जेवणात गोळ्या द्या, औषधे द्या.
अशा नीच प्रवृत्तींचा नायनाट झाला पाहिजे.”
“बीडचा कांचन नावाचा माणूस आहे. तो धनंजय मुंडे यांचा पी.ए. किंवा कार्यकर्ता आहे. धनंजय मुंडे हे षडयंत्र रचत आहेत. बीडच्या पी.ए.ने आरोपींना घेऊन गेले. कांचन आणि धनंजय मुंडे यांची २० मिनिटांची चर्चा झाली. परळीत सुरू असलेल्या बैठकीत एक नेता उपस्थित होता. मला मारण्यासाठी अडीच कोटींची डील झाली,” असे जरांगे म्हणाले.
धनंजय मुंडे संभाजीनगरला आरोपींना भेटण्यासाठी थांबले होते. तिथे चर्चा झाली. यांची वारंवार धनंजय मुंडेंबरोबर बैठक झाली. भाऊबीजेच्या दिवशी मुंबईत संध्याकाळी सह्याद्री बाहेर बैठक झाली. यात आंतरवालीतील एका बडे नावाच्या माणसाचा देखील समावेश आहे. ते तपासले जाईल. आणखी चार जण आहेत. १० ते ११ जणांचा स्टाफ आहे, असे जरांगे म्हणाले.
आरोपींनी गाडी मागितली. धनंजय मुंडे म्हणाले, “माझ्याकडे जूनी गाडी आहे, बाहेरच्या राज्यातील पासिंगची, तुम्ही काय करायचे ते करा.”
यातील प्रमुख धनंजय मुंडे आहेत. अशी वृत्ती शोभत नाही. खूप भयंकर डाव आखला गेला. पंकजा मुंडे ताईंचा विषयही आरोपींना माहीत आहे. सुरेश धस, बावनकुळे साहेबांच्या भाच्याचे प्रकरणही त्यांना माहीत आहे. राज्यातील बऱ्याच जणांच्या सीटाखाली मोबाईल ठेवले आहेत. ही टोळी संपवायची आहे. मी खंबीर आहे, म्हणून नाही तर यांच्या टोळीला कुणी हात लावला नाही, म्हणून आपण बाप झालो,” असे मनोज जरांगे म्हणाले.












Leave a Reply