News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल अष्टमी
🌸 नक्षत्र…. श्रवण
🌸 वार… गुरुवार
🌼 दिनांक….. ३० आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ३० ऑक्टोंबर २०२५

मेष: मनाला चंचलता असेल. मनाच्या चंचलतेमुळे नियोजित कामामध्ये निर्णय घेवू शकणार नाही. नवे काम सुरू करण्याआधी नीट विचार करा. उपासना करा. ध्यान प्राणायामाने प्रसन्नता वाढेल.

वृषभ: व्यवहार करतांना सावधगिरी बाळगावी. सहकारी भागिदारांच्या मतांचा आदर करा. कामानिमित्त प्रवास घडतील. मन स्वस्थ राहील.

मिथुन: स्पष्टवक्तेपणा महत्वाचा आहे. संवादाने भागीदारीच्या कामात यश मिळेल. कामातील कौशल्याने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कर्क: उपासना आध्यात्माची आवड निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी तणाव वाढला तरी संवादाने मार्ग निघू शकतो.

सिंह: चांगला दिवस आहे. वरिष्ठांच्या मताचा आदर करा. अध्ययनासाठी अनुकूल. प्रवास कार्यसाधक होतील. कौटुंबिक अपेक्षांचे ओझे वाढेल.

कन्या: नविन जबाबदाऱ्या वाढतील कामामध्ये काही प्रमाणात तणाव असला तरी आपल्याला अपेक्षित यश मिळेल. मालमत्तेसंबंधी लाभ होऊ शकतो.

तुळ: एक पाऊल पुढे टाका भेटीगाठींमधून लाभ होईल. संवाद साधतांना भावनांवर नियंत्रण ठेवा. अडचणींवर मात करू शकाल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

वृश्चिक: नियोजित कामामध्ये यश मिळेल. स्वावर इस्टेटीचे कार्य मार्गी लावण्याचे प्रयत्न करा. आर्थिक लाभ होतील. खर्च वाढेल. मन प्रसन्न राहील. मित्र सहकारी यांचेकडून स्तुती सुमने मिळण्याची शक्यता आहे.

धनु: चांगला दिवस आहे. उत्साहवर्धक कामे होतील. आत्मविश्वास वाढेल. नवीन विचार आकार घेतील. वाणीवर नियंत्रण ठेवा हितशत्रुंना लाभ देवू नका.

मकर: मनात्वाची रे पूर्व संचित केले । पूर्व संचिताच्या जुन्या आठवणीने उदासपणा येवू शकतो, चांगल्या गोष्टींच्या आठवा आनंदी राहा. जुने वाद मिटवण्यासाठी आजचा दिवस योग्य. अंतर्मनातील गोंधळ कमी होईल.

कुंभ: मित्र परिवार सहकारी यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळेल. नविन कल्पनांना बळ देण्यासाठी अनुकूल दिवस आहे.

मीन: मन लावून काम करा. कामामध्ये यश मिळेल. आपल्या कौशल्यामुळे वरिष्ठांचा विश्वास वाढेल. कौटुंबिक जीवन चांगले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *