बीड- छत्रपती संभाजी नगर चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी धक्कादायक निर्णय घेतला आहे.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.केंद्रेकर यांनी शासनाकडे स्वेच्छा निवृत्ती चा केलेला अर्ज शासनाने मंजूर केला आहे.शासकीय सेवेची अडीच वर्षे शिल्लक असताना केंद्रेकर यांनी निवृत्ती का घेतली याबद्दल चर्चा होत आहे.
आपल्या धडाकेबाज निर्णयामुळे महाराष्ट्रात परिचित असलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे ते सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनले होते.बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती.
बीड जिल्ह्यातून त्यांची बदली झाल्यानंतर ती रद्द करण्यासाठी जनआंदोलन उभे राहिले होते.केंद्रेकर यांनी आयकर विभाग,जिल्हाधिकारी छत्रपती संभाजी नगर,क्रीडा आयुक्त म्हणून काम केले आहे.गेल्या वर्षभरपेक्षा अधिक काळापासून ते विभागीय आयुक्त म्हणून छत्रपती संभाजी नगर येथे कार्यरत होते.
त्यांनी महिनाभरापूर्वी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज शासनाकडे पाठवला होता.तो अर्ज मंजूर झाला आहे.3 जुलै रोजी ते निवृत्त होणार आहेत.
Leave a Reply