मेष गुरु सुख स्थानी प्रवेश करेल. सुखांमध्ये वाढ होईल. घरात आनंदी वातावरण असेल. भरपूर आनंद येईल.
वृषभ पाचवा शुक्र आणि त्याच्या लाभातील उच्च गुरु यामुळे पोराबाळांबरोबर खूप छान वेळ घालवता येईल. छोटे प्रवास घडतील. आनंदी दिवाळी जाईल.
मिथुन बोनस मिळेल. आर्थिक दृष्ट्या संपन्नता अनुभवाल.कुटुंबात वेळ अगदी मजेत जाईल.
कर्क अगदी दिवाळीपूर्वी गुरु महाराज राशीत येतील. हा योग तेरा वर्षांनी येतो. सगळा शीण निघून जाईल. “आनंद गगनात माझ्या माईना” असा अनुभव येईल. सर्व स्तरावर एकदम खुश होऊन जाल.
सिंह मिनी साडेसातीचा विसर पडेल. चैनीच्या वस्तूंवर मुक्त हस्ताने खर्च करता येईल. चिंता मिटून जातील. जल्लोष साजरा कराल.
कन्या सोने पे सुहागा असा काळ आहे. यावेळी गुरु शुक्र धम्माल उडवून देतील. तुमचा मूड अगदी उत्तम असेल. पैसा येईल, आनंद सुख समाधान ही त्यापाठोपाठ येईल.
तुळ राशीत असणारे रवी, मंगळ बुध एक वेळीच ऊर्जा प्रदान करतील. तुमचे वजन, मान, रुतबा वाढीस लागेल. कुटुंबासोबत एक आनंदी पर्व enjoy कराल.
वृश्चिक बरोब्बर दिवाळी पूर्वीपासूनच गुरु महाराजांच्या मर्जीत रहाल. त्यामुळे आकाश ठेंगणे होईल. उत्तम गुरू बळ, लाभ स्थानी असलेला शुक्र त्यामुळे नुसती धम्माल असणार आहे.
धनु सर्व बाबतीत सुधारणा करून देणारा आणि त्यामुळे उत्तम शांती मिळणारा काळ. अचानक चांगली सरप्राइज मिळणार आहेत त्यामुळे हा सण खूपच सुखात जाईल.
मकर भाग्य स्थानी शुक्र आणि सातवा गुरु. अजून काय पाहिजे? नुसती मौजमजा येणार आहे. मूठभर मांस चढेल इतके मोठे आनंदा चे दान तुमच्या पारड्यात पडणार आहे.
कुंभ नोकरीत शुभ शुभ घटना घडतील. आठवा शुक्र अचानक काहीतरी अर्थ प्राप्ती करून देईल. भरपूर आनंद लुटाल. एक रिलॅक्स करणारा काळ ठरेल.
मीन राशी स्वामींच्या खास मर्जीत असाल. बरोब्बर समोर शुक्र. त्यामुळे आनंदी आनंद गडे अशी गोड दिवाळी साजरी कराल. इथून पुढचा काळ बराच सुखावह जाईल.
सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण अमावस्या / अभ्यंग स्नान / लक्ष्मीपूजन ०६/१० ते ०८/४० / अमावस्या समाप्ती ०५/४० मि.
🌸 नक्षत्र…. चित्रा
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. २१ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशिमंथन‼️
दिनांक २१ ऑक्टोंबर २०२५
मेष:- आज लक्ष्मी प्रसन्न राहील.हाताखालचे कामगार साथ देतील.आरोग्य सांभाळा.
वृषभ:- आज मस्त दिवस आहे.संतती साठी खर्च कराल.अकल्पित धनप्राप्ती चे योग. प्रेमात यश.विवाह इच्छुकांना शुभ बातमी मिळेल.
मिथुन:- आज अत्यंत सुंदर दिवस आहे.नवीन वाहन खरेदीचे योग. वाहन सौख्याचा दिवस.सामाजिक क्षेत्रात मान मिळेल.
कर्क:- आज पत्रव्यवहार, इमेल द्वारा लाभ घडेल.भावंडाकडून लाभ होईल.छोटे प्रवास होतील.
सिंह:- आज कलाकारांना सुसंधी प्राप्तीचे योग. सुरुची भोजनाचा आस्वाद घ्याल.दागिने,वस्त्र खरेदीची शक्यता.
कन्या:- आज अचानक लाभाचे योग. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल.मौल्यवान वस्तू खरेदी होईल.
तुळ:- आज आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे.
योग्य कारणास्तव खर्च कराल.
घाईघाईने निर्णय घेऊ नयेत.
वृश्चिक:- आज अत्यंत सुंदर दिवस.मैत्रिणींशी भेटीगाठी होतील.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.मौजमजेचा दिवस.
धनु:- आज कामात सुयश मिळेल. आर्थिक लाभ होतील. सौख्य लाभेल. गुंतवणूक वाढेल.महिलांच्या मार्फत लाभ होतील.
मकर:- आज एखाद्या घरगूती समारंभात मित्रमैत्रिणी सोबत मज्जा कराल. स्वप्ने पूर्ण होतील. दूरचे प्रवास घडतील.वृद्धांच्या कडून लाभ होतील.
कुंभ:- आज अष्टम स्थानी चंद्र आहे. आर्थिक लाभ होतील. स्त्रीधन वाढेल.वारसाहक्क,लॉटरी मध्ये लाभ होतील.
मीन:- आज विवाह सौख्य लाभेल.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते. पतीसोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.नवीन खरेदी होईल.












Leave a Reply