बीड – बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये बळजबरीने कायद्यांचे धर्मांतरण करण्याच्या आरोपावरून वादात सापडलेले कारागृह अधीक्षक पेट्रेस गायकवाड यांचे अखेर उचल बांगडी झाली असून थेट नागपूरला बदली करण्यात आली आहे.
बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये जे बंदीवान कैदी आहेत त्यांच्यावर बळजबरीने धर्मांतरण करण्यासाठी कारागृह अधीक्षक गायकवाड हे बळजबरी करतात त्यांना जाणीवपूर्वक मारहाण करणे अन्नपाणी न देणे अशा प्रकारे त्रास दिला जातो असा आरोप या कायद्यांच्या वकिलाने तसेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती अगोदरच जळगाव येथील एका बंदीवान कायद्याच्या खून प्रकरणात वादात अडकलेले गायकवाड हे बीडमध्ये आल्यानंतर पुन्हा वादग्रस्त ठरले त्यामुळे अखेर त्यांची बीड येथून उचल बांगडी करण्यात आले असून त्यांना नागपूर येथे उपाधीक्षक म्हणून पाठवण्यात आले आहे.












Leave a Reply