बीड – मागील काही दिवसांपूर्वी बीड मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पालकमंत्री मा.अजित पवार यांना आ.संदीप क्षीरसागरांनी भेट घेऊन अहवाल सादर केला.
आ.संदीप क्षीरसागर यांनी दि.१४ (मंगळवार) रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांची भेट घेत अतिवृष्टीच्या नुकसानीचा अहवाल सादर करत विविध मागण्यांचे पत्र दिले.
यामध्ये भूस्खलनाच्या धोक्यामुळे कपिलधारवाडी येथे माळीण गावासारखी दुर्घटना होण्याची शक्यता असून या गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. तसेच अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या आणि पुढील काळात देखील संभाव्य धोका असलेल्या हिंगणी खुर्द गावाचे स्थलांतर करण्याची मागणी देखील आ.संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.
याव्यतिरिक्त बीड मतदार संघातील रस्ते व पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास मोठी अडचण येत आहे. अनेक गावांचे संपर्क तुटल्याने हे रस्ते व पूल तातडीने दुरुस्त करण्यात यावे तसेच काही ठिकाणी नवीन रस्ते आणि पूल करण्यात यावे. यासह सार्वजनिक मालमत्तेचे झालेल्या नुकसानीचा अहवाल अजित पवारांना सुपूर्द करून तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती केली.












Leave a Reply