सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण पंचमी /संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी
🌸 नक्षत्र…. रोहीणी
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. ११ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
आजचे दैनिक राशी मंथन
दिनांक ११ आँक्टोंबर २०२५
मेष:- आज फारशी अनुकूलता नाही. महत्वाचे निर्णय आज घेऊ नका. कामात विघ्न संभवतात. मौल्यवान वस्तू सांभाळा. बोलताना काळजी घ्या. कर्जे घेणे टाळा.
वृषभ:-
आज मन उत्साही राहील. अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमचे अंदाज अचूक ठरतील. वस्त्र अलंकार मिळतील. एखादी चांगली बातमी समजेल.
मिथुन:-आज व्यय स्थानी चंद्र आणि हर्षल युती आहे. आज कोणतीही जोखीम घेऊ नका. विनाकारण इतरांशी स्पर्धा नको. मोठे खर्च संभवतात. एखादी सहल घडेल.
कर्क:- आज लाभ स्थानी चंद्र आणि हर्षल युती आहे. आनंद देणारा दिवस आहे. भरभराट होईल. मित्रांचा सहवास लाभेल. अर्थलाभ होतील. वैवाहिक सौख्य लाभेल.
सिंह:-आज इच्छापूर्ती करणारा दिवस आहे. तुमच्या अधिकारात वाढ होईल. अचूक एखादा सुखद क्षण अनुभवला येईल. गृहसौख्य लाभेल. तुमच्या उत्तम कामानिमित्त बक्षीस मिळेल.
कन्या:-नवम स्थानी चंद्र आहे. आज काळजी घेतली पाहिजे. अशक्तपणा जाणवेल. खर्च वाढू शकतो. एखादा अपमानाचा प्रसंग येऊ शकतो. तुमच्या अधिकारप्रमाणे मान मरातब मिळणार नाही.
तुळ:- अष्टम स्थानी चंद्र हर्षल युती आहे. आज काळजीपूर्वक पावले टाका. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. अर्थहानी होऊ शकते. वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
वृश्चिक:- आज वैवाहिक सौख्य लाभेल. मान सन्मान मिळतील. चांगल्या मित्रांचा सहवास लाभेल. स्पर्धेत यश मिळेल. प्रवास घडतील. भागीदारी व्यवसायात काही विसंवाद संभवतो.
धनु:- आज अचानक धनालाभचे योग आहेत. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. सज्जन व्यक्तींचा सहवास लाभेल. मंगल कार्यासाठी प्रवास घडेल. स्नेहबंध वाढतील.
मकर:- पंचम स्थानी चंद्र आहे. मनाचा संभ्रम होऊ शकतो. एखादा महत्वाचा निर्णय घेताना योग्य सल्ला घ्या. आज खर्च वाढू शकतात. एखादी अप्रिय बातमी समजू शकते.
कुंभ:- आज कौटुंबिक कामासाठी वेळ द्यावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अनामिक भय दाटून येईल. अर्थ हानी होईल. मोठे निर्णय नकोत. वास्तू संबंधित कामे आज पूर्ण होणार नाहीत.
मीन:- आज तुमचा जयजयकार होणार आहे. कौतुक आणि प्रशंसा होईल. जिवलग मित्रांचा सहवास लाभेल. नवीन मित्र मिळतील. अर्थलाभ होईल. एखादी मोठी घोषणा कराल.












Leave a Reply