News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल चतुर्दशी / कोजागिरी पौर्णिमा /पौर्णिमा प्रारंभ दु. १२/ ३४ मि.
🌸 नक्षत्र…. उ. भाद्रपदा
🌸 वार… सोमवार
🌼 दिनांक….. ०६ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१७ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशिभविष्य‼️दिनांक ०६ आँक्टोंबर २०२५

मेष:- आज लाभस्थानी चन्द्र आहे.सर्वर्थाने सुंदर दिवस. ऐहिक सुख लाभेल. विवाह इच्छुकांना शुभ समाचार मिळेल.

वृषभ:- आज लाभ होतील.धार्मिक कार्यात सहभाग घ्याल. वडीलधाऱ्या लोकांची साथ मिळेल. व्यवसायात लाभ होईल.कामे मार्गी लागतील.

मिथुन:- आज उत्तम दिवस आहे.संतती इच्छुकांना खुश खबर मिळेल. तीर्थयात्रा घडेल.सहलिचे बेत आखाल. शिक्षणात एकाग्रता साधेल.

कर्क:- आज अष्टमात चन्द्र आहे.आळसवलेला दिवस राहील.विश्रांती ची गरज भासेल.रुटीन चालू ठेवा.

सिंह:- आज सप्तम स्थानी चंद्र आहे.प्रिय व्यक्ती सोबत आनंदी क्षण व्यतीत कराल.मस्त मेजवानी चा बेत होईल. पतीची मर्जी राहील.नवीन खरेदी होईल.

कन्या:- आज सुखद अनुभव येतील. कामात प्रगती होईल. स्वतःच्या आनंदासाठी खर्च कराल. आर्थिक चिंता दूर होईल.घरगुती वातावरण प्रसन्न राहील.मनासारखी खरेदी होईल.

तुळ:- आज मन आनंदी राहील. प्रेमात यश मिळेल. धार्मिक कामात सहभाग घ्याल.मैत्रमंडळी कडून लाभ होतील.

वृश्चिक:- आज सुखद क्षण येतील.आर्थिक दृष्टीने चांगला दिवस.पतीची साथ मिळेल.घरगुती कामात मग्न रहाल.नवीन ओळखीतून लाभ होतील.

धनु:- आज भावंडांची भेटीगाठी होतील.कलाकारांना नवीन संधी चालून येतील.मन प्रसन्न राहील.उत्साह वाढेल.

मकर:- आज कामाचा ताण वाढेल.मेजवानीचा लाभ घ्याल.कठोर बोलणे टाळा.नात्यात संपर्क करा.कलाकारांना छान दिवस.

कुंभ:- आज प्रसन्न करणाऱ्या घटना घडतील.तुमच्या च राशीत चन्द्र आहे.वाहन सौख्याचा दिवस.वक्तृत्व चमकेल. प्रसिद्धी मिळेल. आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. धार्मिक कार्यात भाग घ्याल. मुलांकडून कडून छान बातमी समजेल.भाग्य उजळेल.

मीन:- आज संमिश्र दिवस आहे. रुटीन चालू ठेवा.महत्वाची कामे पुढे ढकला.योग्य कारणास्तव खर्च होईल. दानधर्म करण्यास चांगला दिवस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *