News & View

ताज्या घडामोडी

gevrai temple water flood 1 202009490617

राक्षसभुवन, पांचांळेश्वर पाण्याखाली!32 गावांना सतर्कतेचा ईशारा!

गेवराई -पैठण येथील जायकवाडी धरण जवळपास ९७ टक्के भरले असून अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी पाण्याचा प्रवाह नगर आणि नाशिक जिल्ह्यातून सुरू असल्याने धरणातून गोदावरी नदीत १ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून नदी तीरावरील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे असलेले शनी मंदिर व पांचाळेश्वर येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. ३२ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पैठण येथील जायकवाडी धरणातून शनीवारी रात्री १८ दरवाजे उघडून  एक लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पाचांळेश्वर येथील आत्मतिर्थ मंदिर, राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पाण्याखाली गेले आहेत. पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने गोदावरी काठच्या गावांना प्रभारी तहसीलदार  यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

img 20250914 wa00184762501821487258010

जायकवाडी धरणातून मोठा विसर्ग होत असल्याने गेवराई तालुक्यातील 32 गावांत गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. यामुळे तिर्थक्षेत्र असलेल्या पांचाळेश्वर येथील आत्मतिर्थ दत्त मंदिर, राक्षसभुवन येथील शनि महाराज मंदिर पूर्णपणे पाण्यात गेले आहे.  पाणीपातळी अधिक झाल्यास तालुक्यातील गुंतेगावं, बोरगांव, पाथरवाला, पांचाळेश्वर, राक्षसभुवन, सावळेश्वर, म्हाळसपिपंळगावं, नागझरी, खामगाव, आगरनादुंर, पांढरी,मिरगावं,पागुळगावं, राजापुर,रामपुरी,भोगलगावं आदि गावांना पाण्याचा वेढा पडू शकतो. यामुळे या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. 

img 20250914 wa00223584889640427273320

३२ गावे 19वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत

२००६ व २००७ साली जायकवाडी धरणातुन अडिच लाख क्युसेक पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. त्यामुळे तालुक्यातील ३२ गावात पुराचे पाणी घुसल्याने नागरिकाचे स्थलांतर करण्यात आले होते. पुराने हजारो हेक्टर शेतीचे व घराचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने या गावच्या पुनर्वसनाचे आश्वासन दिले होते. मात्र तब्बल 19 वर्षानंतरही या गावांचे पुनर्वसन झाले नाही. कोणत्याही लोक प्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही. यामुळे या ३२ गावातील नागरीक पावसाळ्यात जिव मुठीत घेऊन येथे राहतात. 
अधिक माहितीसाठी आमच्या YouTube चॅनेल वर पहा: https://youtu.be/DPdudukisYg

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *