News & View

ताज्या घडामोडी

n6805208831757598228251a5c647af87ce8af4dbdfe4d37874caf7afb1d488d08f1a37392079de88dec934

भरती घोटाळा :शिक्षणाधिकाऱ्यांसह तिघांना अटक!

नाशिक – सेवा जेष्ठता डावलून बोगस भरती केल्याप्रकरणी नाशिकचे शिक्षणाधिकारी आणि अन्य दोन अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.

मालेगावातील महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण संस्थेच्या कर्मवीर यादवराव नारायण जाधव विद्यालयाचे अध्यक्ष संशयित सुनिल माधव वडगे, सचिव जिभाऊ रघुनाथ आहिरे, मुख्याध्यापक नंदलाल भिमाजी ताजणे, वरिष्ठ लिपिक संदीप विश्वानाथ जाधव यांच्याविरुद्ध मालेगाव छावणी पोलिसांत गुन्हा नोंद आहे. संस्थेला सन २०१२ मध्ये चार कनिष्ठ लिपिक पदे मंजूर झाली. त्यापैकी दोन पदे कार्यरत होती तर दोन नव्याने निर्माण झाली. संशयितांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय सहापैकी दोन आरक्षित पदांची भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली. मुख्याध्यापकांनी जाधवला सन २०१२ मध्ये कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती दिली. २५ मार्च २०१२ रोजीच्या ठरावासह आरक्षण पुस्तिकेतही त्याचे नाव नाही. जाधव हा संस्थेच्या विश्वस्तांचा मुलगा असून, बनावट कागदपत्रे तयार करुन त्याला दिलेल्या वेतनातून ४५ लाखांची फसवणूक केली असे नमूद आहे.

या.ना. जाधव विद्यालयातील घोटाळा प्रकरणी उपशिक्षणाधिकारी यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोन्ही प्रकरणांमध्ये एकाच रात्री बड्या अधिकाऱ्यांना अटक होऊन शिक्षा झाल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
मालेगाव हायस्कूलमध्ये सेवाज्येष्ठता डावलून नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांना १३ वर्षापासून कार्यरत असल्याचे भासवत शासनाची दोन कोटी ६९ लाख ५६ हजाराची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील व कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार या दोघांना नाशिकच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच येथील या. ना. जाधव विद्यालयातील भरती घोटाळ्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या एका गुन्ह्यात उपशिक्षणाधिकारी उदय देवरे याला देखील अटक झाली आहे. या तिघांना बुधवारी (दि.१०) येथील अपर सत्र जिल्हा न्यायालयात उभे केले असता या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी  ठोठावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *