News & View

ताज्या घडामोडी

IMG 20250905 WA0040

रुग्ण तंदुरुस्त रहावा यासाठी डॉक्टरांनी प्रयत्न करावेत -साडेगावकर महाराज!

डॉ रसिका पारगावकर यांच्या आयुर गायनॅक हॉस्पिटल चे थाटात उदघाटन!

बीड -आलेला रुग्ण हा दुरुस्त तर व्हावाच पण भविष्यात तंदुरुस्त रहावा यासाठी डॉ रसिका पारगावकर यांच्या आयुर गायनॅक या हॉस्पिटल चा उपयोग व्हावा आणि रसिका तो निश्चित पणे करेल असा विश्वास सद्गुरू सुरेश महाराज रामदासी साडेगावकर महाराज यांनी व्यक्त केला.

बीड शहरातील अंबिका चौक भागात डॉ रसिका स्नेहा संतोष पारगावकर यांच्या आयुर गायनॅक या हॉस्पिटल चा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. कार्यक्रमास हभप विनायक महाराज पाटांगणकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय राऊत, डॉ अशोक थोरात, डॉ सुभाष जोशी,दीपाताई क्षीरसागर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख प्रा सतीश पत्की, संपादक गंमत भंडारी, संपादक दिलीप खिस्ती यांची यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सुरेश महाराज म्हणाले कि,अभ्यासोनी प्रकटावे असं म्हणतात, त्याचप्रमाणे पारगावकर कुटुंब डॉक्टर, इंजिनियर, शैक्षणिक क्षेत्रात पारंगत आहे. रसिकाने जे हॉस्पिटल सुरु केले त्याचा बीड वासियांना मोठा फायदा होईल. आयुर्वेदात शमी पत्राला खूप महत्व आहे. गणेशाला दुर्वा वहिल्या जातात कारण त्याला सुद्धा आयुर्वेदात मोठे महत्व आहे, रसिका यांच्या माध्यमातून बीड शहरात आयुर्वेदिक दालन सुरु झाले आहे, तिची भरभराट व्हावी असे आशीर्वाद साडेगावकर महाराज यांनी दिले.

img 20250905 wa0041614592042928856943

वात, पित्त आणि कफ याच बॅलन्स करण्याचं कामं आयुर्वेद करते. नाडी परीक्षा ही आयुर्वेदातसगळ्यात महत्वाची आहे. मी स्वतः या पॅथीचा जवळून अनुभव घेतला आहे. असे मत विनायक महाराज पाटांगणकर यांनी मांडले.

आयुर्वेद ही देशातील सगळ्यात जुनी पॅथी आहे, या पॅथीचा उपयोग आयुर गायनॅक या हॉस्पिटल च्या माध्यमातून बीड कराना होईल, डॉ रसिका हिच्यामुळे बीड वासियांना एक चांगल हॉस्पिटल प्राप्त झालं आहे असे मत बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

डॉ रसिका हिने निवडलेली पॅथी महत्वपूर्ण आहे, या पॅथी मुळे आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी मदत होते. आजच्या काळात फास्टफूड मुळे माणसाच्या शरीरावर घातक परिणाम होतं आहेत, अशावेळी स्त्रियांच्या आजाराशी निगडित एक दालन या निमित्ताने सुरु होतं आहे ही आनंदाची बाब आहे असे मत पूर्णवादी बँकेचे अध्यक्ष डॉ सुभाष जोशी यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी सर्वाना सुदृढ राहण्यासाठी शुभेच्छा देताना रसिका ने जी पॅथी निवडली ती आजच्या काळात महत्वाची असल्याचे सांगितले. रसिकाने माता आणि बालमृत्यू रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत असे मत व्यक्त केले.

यावेळी बोलताना प्राचार्या दीपाताई क्षीरसागर यांनी रसिकाच्या हॉस्पिटल शुभारंभास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ रसिका यांनी बीड शहरातील आयुर्वेदिक स्त्री रोग चिकित्सा करणारे हे पहिलेच हॉस्पिटल असल्याचे सांगत माता माऊली सोबत तरुणीचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहू असा विश्वास व्यक्त केला.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्नेहाताई पारगावकर, संतोष पारगावकर, आशुतोष पारगावकर, सिद्धांत देशमुख, अभय पारगावकर, संदीप पारगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश तालखेडकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *