बीड- माजी जि.प.सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नारायण बलभीम शिंदे यांनी सहशिक्षिका असलेल्या पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फ्लॅटसह इतर कामासाठी पैसे घेवून विश्वासघात करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी नारायण शिंदेंविरूद्ध बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अश की, बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, एप्रिल २००६ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेवून शिंदे यांनी लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारिरीक संबंध ठेवून फ्लॅटसाठी व इतर कामासाठी पैसे घेवून अन्यायाने विश्वासघात केला व जीवे मारण्याची धमकी दिली.
सदरील तक्रारीनुसार नारायण बलभीम शिंदे यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पो.नि.किशोर पवार करीत आहेत.
नारायण बलभीम शिंदे हे नेकनूर जि.प.सर्कलचे माजी सदस्य असून ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही पदाधिकारी आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.












Leave a Reply