बीड – ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराई मध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या समर्थकांनी तुफान दगडफेक केली यावेळी पोलिसांनी लाठी चार्ज करत या कार्यकर्त्यांना पांगवले. यामुळे काही काळ गेवराई मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रा लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित आणि आमदार प्रकाश सोळंके यांच्या विषयी दोन दिवसापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
त्यानंतर पंडित समर्थक कार्यकर्त्यांनी गेवराई शहरात हाके यांच्या पुतळ्याला जोडे मार आंदोलन करत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले होते. या घटनेनंतर लक्ष्मण हाके यांनी ज्या चौकात आपल्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले त्याच ठिकाणी आपण दुग्धाभिषेक करून चहा पिणार असल्याचे जाहीर केले होते.
सायंकाळच्या सुमारास प्रा हाके हे गेवराई शहरात दाखल झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या पंडित समर्थक कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत हाके यांची गाडी अडवली.
त्यानंतर पोलिसांच्या गराड्यात हाके यांना बाहेर काढले जातं असताना काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यानंतर गेवराई शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.












Leave a Reply