ढाकणेनी पत्रात अनेक गोष्टी दडवल्या!
बीड -बोगस शालार्थ आयडी प्रकरणी बीडच्या प्राथमिक विभागाचे पे युनिट अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांनी सर्व मुख्याध्यापक यांना एक पत्र काढले आहे. मात्र इतर जिल्ह्याच्या अधीक्षकांनी काढलेल्या पत्रात ज्या गोष्टी आहेत त्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळून ढाकणे यांनी संस्थाचालक यांना मॅनेजमेंट साठी वेळ दिल्याची चर्चा आहे.

नागपूर मध्ये उघडकीस आलेल्या बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी स्वतंत्र एस आय टी स्थापन केली आहे. पुणे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली नेमेलेल्या समिती मुळे संस्थाचालक हैराण झाले आहेत.
दरम्यान या घडामोडी नंतर आता राज्यातील पे युनिटच्या अधीक्षक यांनी सर्व मुख्याध्यापक यांना पत्र काढले आहे. ज्यामध्ये शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सर्व कागदपत्रे ऑनलाईन करण्याचे आदेश दिले आहेत.
याच धर्तीवर बीडच्या प्राथमिक विभाग पे युनिट चे अधीक्षक राजेंद्र ढाकणे यांनी सुद्धा एक पत्र काढले आहे ज्यामध्ये सर्व मुख्याध्यापकांनी तातडीने 19 ऑगस्टपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे ऑनलाईन करणे बाबत सूचना देण्यात आले आहेत मात्र इतर जिल्ह्यातून जी पत्र निघाले आहेत त्यामध्ये 15 ऑगस्ट पर्यंत कागदपत्रे ऑनलाईन न केल्यास ऑगस्ट महिन्याचा पगार मिळणार नाही असा इशारा दिला आहे परंतु बीडच्या युनिट चे अध्यक्ष राजेंद्र ढाकणे यांनी पगार बंद करण्याबाबत कुठलाही उल्लेख न केल्याने संस्थाचालक आणि बोगस शिक्षकांना वाचवण्याचा हा फंडा तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
युनिट बीडचे अधीक्षक ढाकणे यांनी जाणीवपूर्वक पगार बंद करण्याबाबत उल्लेख टाळला आहे ज्यामुळे संस्थाचालक आणि बोगस शिक्षक यांना मॅनेजमेंट करण्यासाठी संधी मिळेल अशी चर्चा सुरू झाली आहे एकीकडे राज्यभरात बोगस शिक्षक आणि बोगस शालार्थ आयडी याची तपासणी सुरू झालेली असताना ढाकणे यांची कार्यवाही संशयाच्या सापडली आहे.












Leave a Reply