सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल पुत्रदा एकादशी / मंगळागौर पुजन
🌸 नक्षत्र… जेष्ठा
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ०५ आँगस्ट २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४६ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩 🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशिभविष्य ‼️दिनांक ०५ आँगस्ट २०२५
मेष:- सकाळी अष्टम स्थानी चंद्र आहे. नंतर देखील फारशी अनुकूलता नाही. शत्रू त्रास देतील. विनाकारण धाडस नको. प्रवासाचे बेत बदलतील. वाहन जपून चालवा. आज अडचणी वाढू शकतात.
वृषभ:- संमिश्र दिवस आहे. सकाळच्या सत्रात महत्वाची कामे पूर्ण करून घ्या. आर्थिक लाभ होतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. मन अस्वस्थ राहू शकते. अनामिक भय दाटून येईल. उत्तरार्ध प्रतिकूल आहे.
मिथुन:- सहाव्या आणि सातव्या स्थानी चंद्र आहे. अपेक्षा भंग करणारा दिवस आहे. सकाळच्या वेळी व्यावसायिक लाभ होतील. दुपारनंतर शत्रूचा त्रास जाणवेल. गृह कलह होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी मतभेद संभवतात. देवतेची उपासना केल्याने मन स्थिर राहील.
कर्क:- आज स्फूर्ती देणारा दिवस आहे. इर कोणत्या स्रोताने आर्थिक लाभ होतील. पंचम चंद्र तुम्हाला मार्ग दाखवेन. मात्र दुपारनंतर ग्रहमान बदलणार आहे. घरगुती काम पूर्ण होईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. पाण्याच्या जागे जवळ पर्यटन घडेल.
सिंह:- तुम्हाला प्रशंसा आवडते. मात्र राशीस्वामी अनुकूल नाही. खोट्या प्रतिष्ठेपासून दूर रहाणे हिताचे आहे. राजकारणात आज यश नाही. मित्रांचा गैरसमज होऊ शकतो. संध्याकाळी विशेष काळजी घ्या. पाण्यापासून सावध रहा. भलते धाडस नको.
कन्या:- संमिश्र ग्रहमान आहे. व्यावसायिक प्रश्न सुटतील. मर्यादित यश मिळेल. भावनिक लाभ होतील. गृहकलह टाळा. महिलांना पतीच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवा.
तुळ:- सकाळी द्वितीय स्थानी नीच राशीत चंद्रमा आहे. मनात चुकीचे विचार येऊ शकतात. त्यांपासून दूर रहा. व्यय स्थानातील मंगळ खर्च वाढवू शकतो. विशेषतः नात्यातील संबंधात कटुता येऊ शकते. जलोदर किंवा त्या सारख्या व्याधींपासून काळजी घ्या.
वृश्चिक:- आज सकाळी तुमच्याच राशीत चंद्र आहे. अनुकूल कालावधी आहे. आत्मविश्वास वाढेल. भरभराट होईल. मात्र चिंता वाढवणाऱ्या घटना घडू शकतात. दुपार नंतर नात्यात वाद संभवतात. आज स्वभाव मृदू ठेवावा लागेल. सोप्या मार्गाने धन मिळवण्याच्या नादी लागू नका. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको.
धनु:- दिवसची सुरुवात चांगली असली तरी नंतर प्रतिकूल ग्रहमान आहे. काही अप्रिय अनुभव येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचे अधिकार कमी केले जाऊ शकतात. विनाकारण वादविवाद संभवतात. अडचणीतून मार्ग काढावा लागेलं. विहीर, पाणी यांपासून काळजी घ्या.
मकर:- सुरुवातीला लाभ स्थानी चंद्र अनुकूल आहे. या वेळेत महत्वाची कामे पूर्ण करा. सरकारी कामासाठी ही वेळ राखून ठेवा. नात्यातील लोकांना मदत करावी लागेल. प्रवासात त्रास सांभावतो. शौर्य दाखवणे अंगाशी येऊ शकते. लहान भावासाठी वेळ द्यावा लागेल.
कुंभ:- चंद्राची अनुकूलता आहे. मात्र इतर ग्रहमान फारसे अनुकूल नाही. अष्टम स्थानी मंगळ आहे. त्याचा चंद्राशी केंद्र योग आहे. एखादे संकट येऊ शकते. काळजी घ्या. आर्थिक चिंता सतावतील. उधारी टाळा.
मीन:- नवम आणि दशम स्थानी चंद्र आहे. त्याचा तुमच्या राशीतील वक्री शनी आणि वक्री नेपच्यूनशी केंद्र योग आहे. संमिश्र दिवस आहे. अति धाडस नको. राजकीय किंवा सरकारी क्षेत्रातील व्यक्तीकडून त्रास संभवतो. शत्रूच्या ताकदीचा अंदाज घ्या. कोर्टात अपयश संभवते.












Leave a Reply