News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वर्षा
🚩 दक्षिणायन 🌕 श्रावण शुक्ल नवमी
🌸 नक्षत्र… विशाखा
🌸 वार… रविवार
🌼 दिनांक….. ०३ आँगस्ट २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४६ मि.
🌘 सुर्यास्त ०७/१० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

‼️दैनिक राशिभविष्य ‼️ दिनांक ०३ आँगस्ट २०२५

मेष:- अष्टम स्थानी चंद्र असला तरीही आज अनुकूल दिवस आहे. सौख्य लाभेल. मनासारखी कामे होतील. सन्मान मिळतील. आध्यत्मिक लाभ होतील. रानावनात फिरायला जाल. दिर्घकालिन फायदा होईल. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टकोन बदलेल.

वृषभ:- तुमच्या सप्तम स्थानी चंद्र आहे. पराक्रम गाजवाल. सन्मान प्राप्त होतील. नोकरीत चांगले अनुभव येतील. लेखकांना चांगले अनुभव येतील. दीर्घ कालीन परिणाम करणाऱ्या घाना घडतील.

मिथुन:- षष्ठ स्थानी चंद्र आहे. तरीही काही सुखद अनुभव येतील. आवडत्या वस्तूची खरेदी होईल. प्रवासचे नियोजन बदलेल. मन आनंदी राहील. वक्तृत्व चमकेल. मुद्देसूद बोलणे घडेल.

कर्क:- पंचम स्थानी चंद्र आहे. अनुकूल दिवस आहे. संधीचे सोने करा. वेळ दवडू नका. अचानक लाभ होतील. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. छोटी सहल घडेल. श्री. सूर्य उपासना करा.

सिंह:- अनुकूल दिवस आहे. उत्तम प्रगती होईल. वरिष्ठ खुश होतील. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. एखादी मौल्यवान खरेदी होईल. श्री. हनुमान उपासना करा.

कन्या:- तृतीय चंद्र तुम्हाला सिद्धी प्राप्त करून देतील. भरघोस यश मिळेल. व्यापार वाढेल. आरोग्यात छान सुधारणा होईल. संशोधन कार्यास यश मिळेल. परदेश प्रवासाचे नियोजन होईल.

तुळ:- संमिश्र दिवस आहे. आर्थिक लाभ होतील. वारसा हक्काची कामे मार्गी लागतील. नात्यातून लाभ होतील. खर्च वाढेल. भ्रमंती होईल मात्र वाहन जपून चालवा.

वृश्चिक:- तुमच्या राशीत चंद्र आहे. तुमचा दबदबा वाढेल. सामाजिक कार्य कराल. प्रिय व्यक्तीची भेट होईल. अनुकूल राशीस्वामी तुमच्या स्वभावाला साजेशा अनुभूती देईल. कार्यक्षमता वाढेल.

धनु:- व्यय स्थानी चंद्र आहे. संमिश्र दिवस आहे. आर्थिक यश मिळेल. हरवलेली वस्तू सापडेल. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. जोडीदाराशी वाद संभवतो. संततीचे परदेशातून आगमन होईल.

मकर:- चंद्र अनुकूल आहे. राजकीय प्रांतात उत्तम यश लाभेल. विक्री क्षेत्रात वाटचाल कराल. गुंतवणुकीतून उत्तम लाभ होतील. आनंद देणाऱ्या घटना घडतील. हातून पुण्यकर्म घडेल.

कुंभ:- दशम स्थानी चंद्र आहे. व्यवसाय वाढेल. कामाचा ताण वाढणार आहे. मात्र त्यातून आर्थिक फायदा होईल. सामाजिक कार्यातून नावलौकिक मिळेल. अष्टम स्थानी मंगळ आहे. प्रवास घडतील मात्र सांभाळून वाहन चालवा.

मीन:- नवम स्थानी चंद्र आहे. कामाची प्रगती होईल. शत्रू पराभूत होतील. व्यवसाय वाढेल. शत्रू पराभूत होतील. दूरचे प्रवास घडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *