माजलगावचे आ प्रकाश सोळंके यांचा पुढाकार!
बीड – बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना देशोधडीला लावून बँक बुडवणाऱ्या राजाभाऊ मुंडे आणि त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा मोठा प्रवेश सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली मुंडे पिता पुत्र हे अजित दादांकडे प्रवेश करणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना 2008 9 मध्ये राजाभाऊ मुंडे यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला होता मयत असलेल्या तसेच अस्तित्वात नसलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या नावावर किंवा कर्ज प्रकरणे करून मुंडे यांनी शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली होती.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राजाभाऊ मुंडे यांच्या या भ्रष्ट कारभाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देत त्यांना तब्बल 28 महिने जेलमध्ये सडवले होते. बँकेच्या प्रकरणातच राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता आणि ते देखील जेलवारी करून आले होते.
दरम्यान 2014 च्या आसपास राजाभाऊ मुंडे जेलमधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा राजकारणात भाजपच्या बाजूने सक्रिय झाले 2019 ला पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर त्यांनी बीड जिल्ह्याकडे फारसे लक्ष दिले नाही त्यामुळे मुंडे पिता पुत्र अस्वस्थ होते.
2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजाभाऊ मुंडे यांचे पुत्र बाबरी मुंडे यांनी माजलगाव मतदार संघातून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.
दरम्यान जयप्रकाश सोळंके यांच्या विरोधात बाबरी मुंडे यांनी उमेदवारी दाखल केली नवे निवडणूक ही लढवली त्याच प्रकाश सोळुंके यांच्या नेतृत्वाखाली मुंडे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे प्रकाश सोळुंके यांचे नेमके काय मजबुरी आहे की ज्यामुळे त्यांना राजाभाऊ आणि बाबरी ला ऍडजेस्ट करावे लागत आहे अशी देखील चर्चा सुरू आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाल्यानंतरही काकासाठी माघार घेणाऱ्या जयसिंह सोळुंके यांना पुढच्या निवडणुकीत माजलगाव मधून संधी मिळू नये यासाठीच आमदार सोळुंके हे मुंडे पिता पुत्राला जवळ करत असल्याची चर्चा आहे.
ज्या राजाभाऊ मुंडे आणि बाबरी मुंडे यांच्यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक बुडाली त्यांना अजित पवारांकडे थाटात प्रवेश दिला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जे जेल मध्ये जाऊन आले त्यांना त्यांना प्रवेश देऊन अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस जरा जास्तच पवित्र करायची आहे की काय अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.












Leave a Reply