News & View

ताज्या घडामोडी

20250629 072113 scaled

पवार, खाटोकर ला जामीन!

बीड – उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघा जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

बीड शहरातील उमाकिरण कोचिंग क्लास मधील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनुसार प्रा विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोघांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

पोलिसांनी मांजरसुंबा नजीक या दोघांना अटक केल्यानंतर त्यांना सुरुवातीला पोलीस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती

पवार आणि खातोकर या दोघांविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले होते 17 जुलै रोजी पोस्को अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात या दोघांना जामीन मिळाल्यानंतर विनयभंग प्रकरणात देखील न्यायालयाने मंगळवारी या दोघांना जामीन मंजूर केला आहे आरोपींच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ बाळासाहेब कोल्हे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *