News & View

ताज्या घडामोडी

images 16 5

मैं मोम का पुतला नही, तुम्हारी लौ से ए लोह का पुतला पिघल नही सकता -धनंजय मुंडे!

बीड – राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री आ धनंजय मुंडे यांनी पदाधिकारी मेळाव्यात मागील दोनशे दिवसात बीड जिल्ह्याची जाणीवपूर्वक केलेली बदनामी ही आपल्या मनातील सल आहे असं सांगत मैं मोम का पुतला नही, तुम्हारी लौ से ए लोह का पुतला पिघल नही सकता असा शेर सादर करत आपल्या भावना बोलून दाखवल्या.

बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात धनंजय मुंडे बोलत होते. या मेळाव्याला राष्ट्रवादी कॉग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह राज्य पातळीवरील आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या पाच मिनिटाच्या भाषणात धनंजय मुंडे यांनी आपण आज बोलणार नाही असं सांगत इथं बोलायचं कि मैदानात बोलायचं हा आपल्यापुढे प्रश्न होता असं म्हटलं.

मागील दोनशे दिवस आपण गप्प होतो. एक घटना, एक व्यक्ती आणि एक मतदारसंघ असं काही लोकांनी टार्गेट ठरवलं होतं. आपल्यावर व्यक्तिगत टीका झाली. त्याच आपल्याला दुःख नाही मात्र ज्या पद्धतीने आपल्या जिल्ह्याची, आपल्या मातीची जाणीवपूर्वक बदनामी केली गेली ती सल आपल्या मनात कायम आहे. आपण एवढ्या लवकर हार मानणारे नाहीत. तुम्ही कितीही हल्ले केले तरी मी माघार घेणारा नाही, मी लढणारा आहे असं म्हणत त्यांनी एक शेर सादर करत आपल्या भावना व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *