बीड -उमाकिरण लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी पहिल्या तारखेला केवळ तीनच दिवसांची कोठडी मागितल्याने आरोप झाले होते.
उमाकिरण क्लासेस मधील एका सतरा वर्षीय विदयार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पवार आणि खाटोकर यांच्याविरुद्ध पोस्को दाखल झाला होता.
या दोघांना अटक झाल्यानंतर ऐक जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली होती. सोमवारी दुपारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना पाच जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
या प्रकरणात विधिमंडळात चर्चा झाली. आ चेतन तुपे, आ धनंजय मुंडे यांनी हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस आय टी ची घोषणा केली होती. तसेच पोलिसांनी दोनच दिवसांची पिसिआर कशी मागितली याची चर्चा झाली होती.
दरम्यान न्यायालयाने सोमवारी आणखी चार दिवस कोठडीत वाढ केली.












Leave a Reply